---Advertisement---

दीपक चाहरला सीएसकेमध्ये मिळणार नवी जबाबदारी, धोनीने दिले संकेत

On: शनिवार, एप्रिल 17, 2021 11:05 PM
---Advertisement---

आयपीएल २०२१ मधील आठवा सामना चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध पंजाब किंग्स संघात शुक्रवारी (१६ एप्रिल) खेळला गेला. मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात पंजाबला ६ गड्यांनी हरवत चेन्नईने स्पर्धेतील आपला पहिला विजय मिळवला. वेगवान गोलंदाज दीपक चाहर चेन्नईच्या विजयाचा नायक ठरला. त्याचवेळी, चेन्नईचा कर्णधार चाहरकडे एक नवी जबाबदारी देण्यासाठी उत्सुक आहे.

दीपकची घातक गोलंदाजी
दिल्ली विरुद्धच्या सामन्यातील अपयश विसरून चेन्नईचा वेगवान गोलंदाज दीपक चाहरने या सामन्यात स्विंग व वेग यांचा उत्कृष्ट मेळ साधत घातक गोलंदाजी केली. चाहरने आपली चारही षटके संघाची ७ षटके संपताच पूर्ण केली. त्याने या चार षटकात १५ धावा देऊन पंजाबच्या ४ फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला. यात मयंक अगरवाल, ख्रिस गेल, निकोलस पूरन व दीपक हूडा यांचा समावेश होता.

धोनीने केले कौतुक
विजयानंतर चेन्नईचा कर्णधार एमएस धोनीने पारितोषिक वितरण समारंभात आपल्या संघातील खेळाडूंचे कौतुक केले. चाहरबाबत बोलताना तो म्हणाला, “दीपकला आता डेथ ओव्हर्समध्ये गोलंदाजी करण्याचा अनुभव देखील आला आहे. मात्र, मला सध्या वाटते की त्याने पॉवर प्लेमध्येच गोलंदाजी करावी. कारण, डेथ ओव्हर्समध्ये गोलंदाजी करण्यासाठी आमच्याकडे ड्वेन ब्राव्हो आहे.”

धोनीने चाहरसोबतच यावर्षी प्रथमच चेन्नई संघाचा भाग झालेला इंग्लंडचा अष्टपैलू मोईन अलीचेही कौतुक केले. धोनी म्हणाला,
“आम्ही मोईनला तिसऱ्या क्रमांकावरच खेळवू इच्छितो. त्याच्याकडे मोठे फटके खेळण्याची क्षमता आहे आणि आम्हाला त्याचा वापर करायचाय.”

फेब्रुवारी महिन्यात झालेल्या आयपीएल लिलावात चेन्नई सुपर किंग्सने मोईन अलीला ७ कोटी रुपयांना आपल्या संघात सामील केले होते. त्याने हंगामातील पहिल्या दोन्ही सामन्यात धडाकेबाज फलंदाजी करत सर्वांची मने जिंकली आहेत.

महत्त्वाच्या बातम्या –

दोन सामन्यात रोहित बाद होण्यामागे आहे विराटचा हात, वाचा सविस्तर

तोडफोड फलंदाजी! बेअरस्टोने बोल्टच्या गोलंदाजीवर एवढा जोरदार सिक्स मारला की फ्रिजच्या काचांचा झाला भुगा

अबब! पोलार्डने मारला तब्बल १०५ मीटरचा षटकार, पाहा व्हिडिओ

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---