आयपीएलच्या आजच्या सामन्यात चेन्नईच्या मैदानावर मुंबई इंडियन्स आणि सनरायझर्स हैद्राबाद या संघांमध्ये लढत होते आहे. या सामन्यात मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. मुंबईने पहिल्या डावात निर्धारित २० षटकांत ५ बाद १५० धावा उभारल्या.
या डावात सलामीवीर क्विंटन डी कॉकने मुंबईकडून सर्वाधिक ४० धावा केल्या. तर अनुभवी किरोन पोलार्डने ३५ धावांची खेळी करत मुंबईची धावसंख्या १५० पर्यंत पोहोचविण्यात महत्वाचा वाटा उचलला. या छोटेखानी खेळी दरम्यान त्याने मारलेला एक गगनभेदी षटकार चांगलाच चर्चेत आला आहे.
पोलार्डने मारला १०५ मीटरचा षटकार
मुंबईच्या डावातील १७व्या षटकात किरोन पोलार्ड आणि ईशान किशन फलंदाजी करत होते. तर हैद्राबादकडून मुजीब उर रहमान गोलंदाजी करण्यासाठी आला होता. यावेळी मुंबईची धावसंख्या १६ षटके झाली असून देखील केवळ १०७ झाली होती. त्यामुळे शेवटच्या ४ षटकांत त्यांना आक्रमक फटकेबाजीची गरज होती.
हीच गरज लक्षात घेऊन पोलार्डने रहमानच्या पहिल्याच चेंडूवर हल्ला चढवला. त्याने आखूड टप्प्याचा चेंडू लवकर ओळखला आणि सर्व शक्तिनिशी तो मिडविकेट क्षेत्रात भिरकावला. प्रेक्षक गॅलरीत थेट तिसर्या मजल्यावर हा षटकार गेला. रिप्ले मध्ये हा तब्बल १०५ मीटरचा षटकार असल्याचे स्पष्ट झाले.
#MIvsSRH Kieron Pollard ???? pic.twitter.com/sAsiw2j75N
— Vipul Garg ???????? !! (@tweet0logy) April 17, 2021
यंदाच्या आयपीएल मधील हा सर्वात मोठा षटकार ठरला. याआधी ग्लेन मॅक्सवेलने १०० मीटरचा मारलेला षटकार यंदाच्या आयपीएल मधील सर्वात मोठा षटकार होता.
Biggest Six in 2021 IPL (So Far)
Kieron Pollard – 105m
Glenn Maxwell – 100m
Suryakumar Yadav – 99m
Manish Pandey – 96m
Abdul Samad – 93m
Sanju Samson – 91m
Kieron Pollard – 90m#MIvsSRH— CricBeat (@Cric_beat) April 17, 2021
दरम्यान, मुंबईने दिलेल्या १५१ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करतांना हैद्राबादने आक्रमक सुरुवात केली होती. डेव्हिड वॉर्नर आणि जॉनी बेअरिस्टोने ६ षटकांतच बिनबाद ५७ धावांची सलामी दिली होती. मात्र त्यानंतर आठव्या आणि नवव्या षटकांत अनुक्रमे जॉनी बेअरिस्टो आणि मनीष पांडे बाद झाले आहेत. त्यामुळे सामन्यात रंगत निर्माण झाली असून शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा हैद्राबादच्या ९ षटकांत २ बाद ७० धावा झाल्या आहेत.
महत्वाच्या बातम्या:
विश्वचषक विजेत्या भारतीय कर्णधाराचे कुटुंबीय कोरोनाबाधित, रेमडीसिवरसाठी मागितली मदत
मध्यप्रदेशच्या क्रिकेटरला ऑनलाइन पिझ्झा मागवणे पडले महागात; झाली तब्बल ५० हजारांची लूट, वाचा सविस्तर






