---Advertisement---

मध्यप्रदेशच्या क्रिकेटरला ऑनलाइन पिझ्झा मागवणे पडले महागात; झाली तब्बल ५० हजारांची लूट, वाचा सविस्तर

On: शनिवार, एप्रिल 17, 2021 7:46 PM
---Advertisement---

आजकाल अनेकदा ऑनलाईन फसवणूकीच्या बातम्या समोर येत असतात. आता तर एका मध्यप्रदेशमधील क्रिकेटपटूही ऑनलाईन फसवणूकीचा फळी ठरला आहे. विक्रांत सिंग भदोरिया, असे नाव या खेळाडूचे नाव आहे. तो मध्यप्रदेशकडून देशांतर्गत क्रिकेट खेळतो.

त्याला कोरोना काळात ऑनलाईन पिझ्झा मागवणे महागात पडले आहे. पिझ्झा मागवताना त्याच्या बँक खात्यातून पैसे उडाले असून तो ऑनलाइन फसवणूकीला बळी पडल्याने त्याने गुन्हा दाखल केला आहे.

विक्रांत भदोरिया हा ग्वाल्हेर येथील रहिवासी असून तो 19 वर्षांखालील भारतीय संघातही खेळला आहे. गुरूवारी 15 एप्रिल रोजी संध्याकाळी डोमिनोज पिझ्झाकडून ऑनलाईन ऑर्डर मागवताना त्याच्यासोबत हा घोटाळा झाला. इंटरनेटवर त्याला डोमिनोज पिझ्झा सेंटरचा ग्राहक सेवा क्रमांक सापडल्यानंतर त्याने त्या नंबरवर फोन करून चीज पिझ्झा मागवला.

पिझ्झा बुक केल्यावर पेमेंटसाठी त्याच्या मोबाईलवर एक लिंक आली लिंक उघडताच एक ऍप डाउनलोड झाले आणि त्याच्या खात्यातून सुमारे 50 हजार रुपये काढून घेण्यात आले. लुटारूंनी एकाचवेळी संपूर्ण 50 हजार रुपये काढले नाहीत, कारण 50 हजारांच्या व्यवहारासाठी बँक खाते पॅनकार्डशी जोडावे लागते. या फसवणूकीला बळी पडल्यानंतर त्याने गुन्हे शाखेकडे तक्रारही दिली.

नुकत्याच पार पडलेल्या विजय हजारे चषकामध्ये तो मध्यप्रदेश क्रिकेट संघाचा एक भाग होता. मात्र, त्याला या स्पर्धेत एकही सामना खेळायला मिळाला नाही. पोलिस अधीक्षक (राज्य सायबर झोन ग्वाल्हेर) सुधीर अग्रवाल यांनी यापूर्वीच सर्वांना सावधान केले असून कोणालाही कुठल्याही कंपनीची किंवा फॉर्मची गरज भासल्यास थेट इंटरनेटवर शोधण्याऐवजी त्या कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवर शोधल्यास आपल्याला योग्य नंबर सापडेल, असे सांगितले होते.

कोविड -19 च्या वाढत्या प्रकरणांमुळे लॉकडाऊन असूनही हॉटेल आणि रेस्टॉरंट्सना होम डिलिव्हरीची परवानगी देण्यात आली आहे. गुरुवारी (15 एप्रिल) रोजी संध्याकाळी विक्रांतने पिझ्झा मागवण्याचा विचार केला. त्यावेळी त्याने मोबाईलवरून इंटरनेटवर डोमिनोजचा पिझ्झाचा नंबर शोधला. आणि त्यानंबरवरती फोन केला आणि पिझ्झाबद्दल चर्चा केली.

यानंतर त्याने 300 रुपयांच्या चीज पिझ्झाची मागणी केली. यानंतर पिझ्झा बुकिंग केला त्यानी त्याच्या मोबाइल नंबरवरती एक लिंक शेअर केली. ही लिंक उघडताच एक ऍप डाउनलोड करण्यात आले आणि त्याचा मोबाइल स्वयंचलितपणे चालू लागला आणि यानंतर त्याच्या खात्यातून 49 हजार 996 रुपये काढून घेण्यात आले. बँक खात्यातून पैसे गेल्यानंतर त्याला फसवणूक झाल्याचे समजले. त्यानंतर त्याने अगोदर आपले बँक खाते ब्लॉक केले आणि गुन्हा शाखेत या प्रकरणी तक्रार दिली. पोलिसांनी या फसवणूकीची एफआयआर नोंदविली आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

वार्षिक करारातील जडेजाच्या श्रेणीवरून होतोय वाद, वॉननंतर माजी भारतीय खेळाडूचीही टीका

हे कारण होते तर! रोहित आणि हार्दिकच्या पत्नी केकेआर सामन्यावेळी आश्चर्यचकीत होण्यामागचे गुपीत उलगडले

दीपक चहरने विनंती करूनही का नाही घेतले डीआरएस? खुद्द धोनीनेच केला खुलासा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---