---Advertisement---

कर्णधार रोहितने घेतली ‘प्रतिज्ञा’, जग जिंकण्याआधी आशिया चषकावर कोरायचे आहे भारताचे नाव

Asia-Cup-Promo
---Advertisement---

रोहित शर्मा याच्या नेतृत्त्वाखालील भारतीय संघ सध्या वेस्ट इंडिज दौऱ्यावर असून उभय संघात ५ सामन्यांची टी२० मालिका सुरू आहे. या मालिकेनंतर भारतीय संघाला आशिया चषक २०२२ खेळायचा आहे. २७ ऑगस्ट रोजी या स्पर्धेला प्रारंभ होणार आहे. संयुक्त अरब अमिराती येथे खेळवल्या जाणाऱ्या या स्पर्धेत भारतीय संघ विजयाचा प्रबळ दावेदार आहे. तत्पूर्वी भारतीय संघाचा कर्णधार रोहितचा एक व्हिडिओ पुढे आला आहे, ज्यामध्ये तो आशिया चषक जिंकण्याची इच्छा व्यक्त करताना दिसत आहे.

आशिया चषकाच्या प्रसारणकर्त्यांनी आशिया चषकाचा प्रोमो जाहीर केला आहे. या प्रोमोत रोहित वेगळ्याच अंदाजात दिसत आहे. प्रोमोमध्ये तो जग जिंकण्यापूर्वी आपल्याला आशिया चषक जिंकायचा असल्याचे सांगताना दिसत आहे. रोहितचा या व्हिडिओतील उत्साह पाहून चाहते प्रभावित झाले आहेत.

व्हिडिओच्या सुरुवातीला रोहित म्हणतो की, “सात वेळा आशिया चषक उचलणे, जगातील नंबर संघ म्हणून घेणे, नवे विश्वविक्रम बनवणे. पण या सर्वांमध्ये तितका अभिमान नाही, जितका १४० कोटी भारतीय चाहत्यांच्या तोंडून भारत… भारत… ऐकण्यात आहे. तर मग चला, याच अभिमानाच्या जोरावर आपण या जगावर वर्चस्व गाजवू. पण त्याआधी आणखी एकदा आशियावर तिरंगा फडकवू.” रोहितचे हे बोल क्रिकेटप्रेमींमध्येही जोश भरतील असे आहेत.

दरम्यान भारतीय संघ २८ ऑगस्ट रोजी कट्टर प्रतिद्वंद्वी पाकिस्तानविरुद्धच्या लढतीने आशिया चषकाची सुरुवात करेल. उभय संघातील सामना दुबईत होईल. पुढे ३१ ऑगस्ट रोजी दुबईतच त्यांचा दुसरा सामना होईल. आशिया चषकासाठी पात्र ठरणाऱ्या संघासोबत त्यांची लढत होईल.

आशिया चषक २०२२ चे वेळापत्रक:

पहिला सामना- श्रीलंका विरुद्ध अफगाणिस्तान (२७ ऑगस्ट, दुबई)
दुसरा सामना- भारत विरुद्ध पाकिस्तान (२८ ऑगस्ट, दुबई)
तिसरा सामना- बांगलादेश विरुद्ध अफगाणिस्तान (३० ऑगस्ट, शारजाह)
चौथा सामना- भारत विरुद्ध क्वालिफायर (३१ ऑगस्ट, दुबई)
पाचवा सामना- श्रीलंका विरुद्ध बांगलादेश (१ सप्टेंबर, दुबई)
सहावा सामना- पाकिस्तान विरुद्ध क्वालिफायर (२ सप्टेंबर, शारजाह)
सातवा सामना- बी१ विरुद्ध बी२, सुपर-४ (३ सप्टेंबर, शारजाह)
आठवा सामना- ए१ विरुद्ध ए२, सुपर-४ (४ सप्टेंबर, दुबई)
नववा सामना- ए१ विरुद्ध बी१, सुपर-४ (६ सप्टेंबर, दुबई)
दहावा सामना- ए२ विरुद्ध बी२, सुपर-४ (७ सप्टेंबर, दुबई)
अकरावा सामना- ए१ विरुद्ध बी२, सुपर-४ (८ सप्टेंबर, दुबई)
बारावा सामना- बी१ विरुद्ध ए२, सुपर-४ (९ सप्टेंबर, दुबई)
अंतिम सामना- पहिले सुपर-४ विरुद्ध दुसरे सुपर-४ (११ सप्टेंबर, दुबई)

 

महत्त्वाच्या बातम्या-

टी२० मालिकेत विजयी आघाडी घेण्यासाठी रोहितसेना सज्ज, शेवटच्या २ सामन्यांसाठी टीम्स फ्लेरिडात दाखल

टीम इंडियाचा उपकर्णधार म्हणतो, ‘जबाबदाऱ्या अधिक विचार करायला लावते’

रेणुकाच्या अफलातून गोलंदाजीने विरोधी संघाच्या दांड्या गुल! एकाच व्हिडिओमध्ये पाहा विकेट्सचा थरार

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---