एशिया कप स्पर्धेत दमदार कामगिरी करत 7 व्यांदा विजेतेपद पटकावणाऱ्या भारतीय संघातील खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या वन-डेत क्रमवारीत उल्लेखनीय प्रगती केली आहे.
एशिया कप स्पर्धेत भारतीय सलामीवीरांची जोडी कमालीची यशस्वी दुबईत झालेल्या सुपर फोरच्या सामन्यात पाकिस्तानविरूद्ध 210 धावांची दुबईतील सर्वात मोठी सलामीची भागदारी केली.
स्पर्धेत शिखरने सर्वाधिक धावा(342) ठोकल्या तर रोहितने दुसऱ्या क्रमांकाच्या (317) धावा केल्या आहेत. आयसीसीने ताज्या प्रसिद्ध केलेल्या क्रमवारीत दोघांचीही प्रगती झाली आहे.
या क्रमवारीत रोहित आता भारताच्याच विराट कोहलीनंतर(884) दुसऱ्या क्रमांकावर पोहचला आहे. त्याच्या नावावर 842 गुण झाले आहेत. त्याच्या खालच्या क्रमांकावर इंग्लडचा जो रूट(3) आणि ऑस्ट्रेलियाचा डेव्हीड वार्नरनंतर(4) शिखर धवन (802) गुणासह 5 व्या क्रमांकावर पोहचला आहे.
गोलंदाजीत भारताचा जसप्रीत बुमराह अव्वल स्थानावर कायम असून त्याच्यानंतरच्या क्रमांकावर अफगाणिस्तानचा फिरकी गोलंदाज राशिद खान आहे.
भारताचा फिरकी गोलंदाज कुलदीप यादवने या स्पर्धेत 6 सामन्यात 10 बळी घेतले होते. या कामगिरीच्या जोरावर त्याने गोलंदाजांच्या क्रमवारीत 3 ऱ्या क्रमवारीत स्थानावर झेप घेतली आहेत. त्याच्या नावावर 700 गुण आहेत.
भारतीय संघाच्या गुणसंख्येत 1 गुणाची वाढ झाली आहे. मात्र वन-डेत आयसीसीच्या क्रमवारीतील भारतीय संघ 122 गुणांसह दुसऱ्याच स्थानी आहे.पहिल्या क्रमांकावर असलेल्या इंग्लडच्या नावावर 127 गुण आहेत.
आयसीसी वन-डेतील फलंदाजांची क्रमवारी-
1. विराट कोहली (भारत) – 884
2. रोहित शर्मा (भारत) – 842
3 जो रूट (इंग्लड) – 818
4. डेव्हिड वॉर्नर ( ऑस्ट्रेलिया) – 803
5. शिखर धवन (भारत) – 802
आयसीसी वन-डेतील गोलंदाजांची क्रमवारी-
1. जसप्रित बुमरा (भारत) – 797
2. रशीद खान (अफगाणिस्तान) – 788
3. कुलदीप यादव (भारत) – 700
4. ट्रेंट बोल्ट (न्युझीलंड) – 699
5. जोश हेजलवूड ( ऑस्ट्रेलिया) – 696
महत्वाच्या बातम्या-
-भारतीय कसोटी संघात समावेश झालेला खेळाडू म्हणतोय, माझ्यावर द्रविडचा प्रभाव
-“पाकिस्तानला एकही रुपया देणार नाही”- अनुराग ठाकूर
-आॅस्ट्रेलियाच्या नॅथन लिओनचा पाकिस्तानला दणका क्रिकेटमध्ये भीमपराक्रम