येत्या आशिया चषक २०२२ हंगामासाठी सर्व आशियाई क्रिकेट संघ तयारीला लागले आहेत. यात भारतीय संघाचाही समावेश आहे. ७ वेळच्या आशिया चषक विजेत्या भारतीय संघाने यंदाच्या हंगामासाठी १५ सदस्यीय संघाची घोषणाही केली आहे. तसेच ३ खेळाडूंना स्टँडबायमध्ये ठेवले आहे. या संघात उपकर्णधार केएल राहुल आणि विराट कोहली यांचे दीर्घ काळानंतर पुनरागमन झाले आहे.
राहुलच्या (KL Rahul) पुनरागमनानंतर आता आशिया चषकात कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि राहुल (KL Rahul) ही सलामी जोडी उतरण्याची अपेक्षा आहे. परंतु माजी भारतीय यष्टीरक्षक पार्थिव पटेल (Parthiv Patel) याने रोहितला राहुलसोबत सलामीला न पाठवण्याचा सल्ला दिला आहे.
पार्थिव पटेलच्या मते, आशिया चषकात यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत किंवा दिनेश कार्तिक यांच्यापैकी कोणी एकटाच खेळू शकतो. तर रोहितसोबत राहुलने नव्हे तर विराट कोहलीने सलामी देण्याचा पर्यायही त्याने सुचवला आहे. पार्थिव पटेल त्याच्या यूट्यूब चॅनलवर बोलत होता.
आशिया चषकातील भारतीय संघाच्या प्लेइंग इलेव्हनबद्दल बोलताना पार्थिव म्हणाला की, “रोहित, राहुल तिघांनाही जर अंतिम एकादशमध्ये संधी मिळाली, तर रिषभ पंत किंवा दिनेश कार्तिक यांपैकी कोणाला एकालाच संघात सहभागी केले जाईल. या कारणास्तव मला वाटते की, विराटने रोहितसोबत सलामीला फलंदाजीसाठी उतरावे. त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर सूर्यकुमार यादव, चौथ्या क्रमांकावर रिषभ पंत यांनी यावे. असे करण्यामागचे कारण म्हणजे, पंत डावखुरा फलंदाज आहे.”
तसेच पार्थिव पटेलने पुढे वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी याला आशिया चषकासाठी दुर्लक्षित करण्याच्या निर्णयाबद्दलही प्रतिक्रिया दिली आहे. “मोहम्मद शमीला आशिया चषकासाठी भारतीय संघात सहभागी न केल्याने मी चकित आहे. मला शंका आहे की, तो भारताच्या टी२० क्रिकेट योजनांचा भाग नाही,” असे पार्थिव पटेलने म्हटले.
आशिया चषक २०२२साठी भारतीय संघ
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत, दीपक हुडा, दिनेश कार्तिक, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, आर अश्विन, युझवेंद्र चहल, रवी बिश्नोई, भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंग, आवेश खान.
स्टँडबाय – श्रेयस अय्यर, अक्षर पटेल आणि दीपक चहर.
महास्पोर्ट्सच्या व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
रिषभ पंतवर उत्तराखंड सरकारने सोपवली मोठी जबाबदारी, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मिळणार सन्मान
‘या’ कारणामुळे ११ वर्षांपूर्वी आजचा दिवस महेंद्रसिंग धोनीसाठी ठरला होता काळा दिवस