---Advertisement---

…तरीही रोहित शर्मा, रिषभ पंत आणि शुबमन गिल सिडनी कसोटीत खेळणार

On: रविवार, जानेवारी 3, 2021 6:43 PM
---Advertisement---

ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असलेल्या भारतीय संघाचा ऑस्ट्रेलियाविरुद्ध तिसरा कसोटी सामना ७ जानेवारीपासून सिडनी येथे होणार आहे. पण या कसोटी सामन्याला काही वेळ असल्याने ४ जानेवारीपर्यंत भारत आणि ऑस्ट्रेलिया संघाला मेलबर्न येथेच थांबण्यास सांगण्यात आले होते. मात्र या दरम्यान १ जानेवारीला भारताचे काही क्रिकेटपटू मेलबर्नच्या एका हॉटेलमध्ये जेवण करायला गेले असता एका चाहत्याने नकळत त्यांच्या जेवणाचे बिल भरले. आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर त्याने बिलचा फोटोदेखील शेअर केला आहे. मात्र नंतर हे प्रकरण चांगलच चिघळलं.

रोहित, पंत, गिल खेळणार

हॉटेलमध्ये जेवायला गेलेल्या क्रिकेटपटूंमध्ये उपकर्णधार रोहित शर्मासह नवदीप सैनी, पृथ्वी शॉ, शुबमन गिल आणि रिषभ पंत यांचा समावेश आहे. त्यांच्या जेवणाचे बिल भारतीय संघाचा चाहता नवलदीप सिंग याने भरले होते. हे जेव्हा खेळाडूंना कळाले, तेव्हा त्यांनी त्याच्याशी संवाद साधला.

दरम्यान या घटनेमुळे भारतीय क्रिकेटपटूंनी जैव सुरक्षित वातावरणाचा भंग केला आहे की नाही याचा तपास बीसीसीआय आणि क्रिकेट ऑस्ट्रेलियाकडून सुरु झाला. त्यामुळे या पाचही क्रिकेटपटूंना भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेटपटूंपासून दूर करण्यात आले. असे असले तरी त्यांना सराव करण्याची मुभा देण्यात आली आहे.

त्यामुळे आता असा प्रश्न उपस्थित होत आहे की या खेळाडूंना तिसऱ्या कसोटीत सहभागी होता येणार आहे की नाही? याबाबत द सिडनी मॉर्निंग हेराल्डने दिलेल्या वृत्तानुसार सर्व पाचही खेळाडू तिसरा कसोटी सामना खेळण्यासाठी उपलब्ध होणार आहेत. तसेच जरी या खेळाडूंनी नियमांचा भंग केल्याचे आढळले तरी बीसीसीआय हटवादी भूमीका स्विकारुन रोहित, गिल आणि पंतला अंतिम ११ जणांच्या संघात खेळवण्याची शक्यता आहे.

क्रिकेट ऑस्ट्रेलिया करु शकणार नाही कारवाई –

याबरोबरच या वृत्तात असेही म्हटले आहे की क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या अंतर्गत भारतीय खेळाडू खेळत नसल्याने ते त्यांच्यावर कोणत्याही प्रकारची बंधने टाकू किंवा कारवाई करु शकत नाही.

या सर्व खेळाडूंचे अलगीकरण करण्यात आले असले तरी ते मेलबर्नमधून सिडनीला जाताना मात्र संपूर्ण संघासहच जाणार आहे. पण यावेळी त्यांना संघापासून सोशल डिस्टंसिंगचे सर्व नियम पाळावे लागणार आहेत.

सध्यातरी माध्यमांतील वृत्तांनुसार असेच समजत आहे की बीसीसीआय भारतीय खेळाडूंच्या पाठीशी उभी असून हे सर्व खेळाडू सिडनी कसोटीसाठी उपलब्ध असतील.

महत्त्वाच्या बातम्या –

मेलबर्न येथे होणारे भारतीय संघाचे सराव सत्र ‘या’ कारणामुळे झाले रद्द 

संधी सोडायची नाय! सिडनी कसोटीसाठी नटराजन करतोय कसून सराव, पाहा व्हिडिओ 

“त्याचा जन्मच नेतृत्व करण्यासाठी झाला आहे,” पाहा रहाणेबद्दल कोणी केलंय हे भाष्य

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---