आशिया चषक २०२२ साठी भारताच्या १५ सदस्यीय संघाची घोषणा झाल्यानंतर कर्णधार रोहित शर्मा याने मोठी प्रतिक्रिया दिली आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर संपूर्ण वर्षभर होणाऱ्या क्रिकेट सामन्यांच्या आयोजनाला पाहता भारतीय संघाची बेंच स्ट्रेंथ मजबूत करणे गरजेचे असल्याचे रोहितला वाटते. याखेरीज त्याने भारतीय संघाचे विद्यमान मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्याबद्दलही वक्तव्य केले आहे. तो एका टीव्ही कार्यक्रमात बोलत होता.
मागीलवर्षी झालेल्या टी२० विश्वचषकानंतर भारतीय संघ (Team India) सातत्याने त्यांच्या संघातील खेळाडूंसोबत प्रयोग करताना दिसत आहेत. यामध्ये खेळाडूंना झालेल्या दुखापती आणि वर्कलोड व्यवस्थापन यांचाही समावेश आहे. याबद्दल बोलताना रोहित म्हणाला की, “आम्ही भरपूर क्रिकेट खेळत आहोत. त्यामुळे दुखापती आणि कार्यभार यांचे योग्य व्यवस्थापन करणे गरजेचे आहे. त्यामुळे आम्हाला खेळाडूंना सातत्याने बदलत राहावे लागते. याचा परिणाम असा होतो की, आम्हाला आमच्या बेंच स्ट्रेंथमधील (Strenghtning Bench Strenght) खेळाडूंना मैदानावर उतरवण्याची संधी मिळते. म्हणूनच आम्ही आंतरराष्ट्रीय पातळीवर इतक्या साऱ्या खेळाडूंना आजमावू शकतो.”
पुढे बोलताना रोहित म्हणाला की, “आम्ही आमची बेंच स्ट्रेंथ आणखी बळकट बनवू इच्छित आहोत. ज्यामुळे आम्ही हे सुनिश्चित करू शकू की भारतीय क्रिकेटचे भविष्य सुरक्षित हातात असेल. याचसाठी आम्ही सध्या प्रयत्नशील आहोत.”
प्रशिक्षक द्रविडबद्दल काय म्हणाला रोहित?
तसेच भारतीय संघाचे प्रशिक्षक द्रविड (Coach Rahul Dravid) यांच्याबद्दल विचारले असता रोहित म्हणाला की, “जेव्हा द्रविड भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्त झाले होते, तेव्हा आम्ही एकत्र बसून भारतीय संघाला पुढे घेऊन जाण्यासाठी योजना आखल्या होत्या. त्यांचे विचार अगदी माझ्यासारखेच आहेत. यामुळे माझे काम सोपे झाले आहे.”
रोहित भारतीय संघाचा नियमित कर्णधार बनल्यानंतर भारतीय संघाने सलग ८ मालिका जिंकल्या आहेत. अशात आता क्रिकेटचाहत्यांना भारतीय संघाकडून आशिया चषक २०२२ आणि टी२० विश्वचषक २०२२ जिंकण्याचीही अपेक्षा असेल.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
लईच वाईट! ‘या’ अंपायरचा झालाय रुडी कर्स्टनपेक्षाही दुर्देवी अंत, चक्क बॉम्बस्फोटात गमावला होता जीव
रेणुका सिंगच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम रँकिंग, कॉमनवेल्थमधील प्रदर्शनाचा मोठा फायदा
न्यूझीलंड बोर्डाचा स्टार गोलंदाज ट्रेंट बोल्टला ‘धक्का’, केंद्रीय करारातून केले बाहेर