Rohit Sharma Viral Video :– भारतीय क्रिकेट संघाला 19 सप्टेंबरपासून बांगलादेशविरुद्ध 2 सामन्यांची कसोटी मालिका खेळायची आहे. तत्पर्वी काही भारतीय खेळाडू देशांतर्गत क्रिकेट स्पर्धांमध्ये खेळत आहेत. तर काही खेळाडू विश्रांतीवर आहेत. दरम्यान भारतीय कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) कसोटी मालिकेसाठी तयारी सुरू केली आहे. त्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. तो पार्कमध्ये प्रशिक्षण घेत असल्याचे दिसून येत आहे.
रोहित पार्कमध्ये धावताना दिसला
रोहितचा 30 सेकंदाचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. या व्हिडिओत रोहित पार्कमध्ये धावताना दिसतोय. रोहितने निळ्या रंगाचा टी-शर्ट आणि काळी पँट घातली आहे. तसेच भारतीय कर्णधाराने पांढरी टोपीही घातली आहे. त्याचा हा व्हिडिओ लांबून शूट करण्यात आला आहे. मात्र, हा व्हिडीओ पाहून तो एखाद्या शूटमधला असल्याचेही दिसते.
19 सप्टेंबरपासून कसोटी मालिका सुरू होणार
बांगलादेशचा संघ पुढील महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात भारत दौऱ्यावर येणार आहे. भारत आणि बांगलादेश यांच्यातील कसोटी मालिकेला 19 सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे. पहिली कसोटी 19 सप्टेंबर ते 23 सप्टेंबर दरम्यान चेन्नईत खेळवली जाईल. दुसरी कसोटी 27 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबर या कालावधीत कानपूर येथील ग्रीन पार्क येथे खेळवली जाईल. 2023-25 च्या जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या दृष्टिकोनातून ही मालिका खूप महत्त्वाची आहे.
पहिली कसोटी: 19 ते 23 सप्टेंबर, चेन्नई
दुसरी कसोटी: 27 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबर, कानपूर
Captain Rohit Sharma running in the park, Captain working hard for the Test season.!!!🇮🇳🔥 pic.twitter.com/c8AbIVcEAR
— 𝐑𝐮𝐬𝐡𝐢𝐢𝐢⁴⁵ (@rushiii_12) August 26, 2024
कर्णधार म्हणून रोहित शर्माची कामगिरी
रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने आतापर्यंत 16 कसोटी सामने खेळले आहेत. यांपैकी भारतीय संघाने 10 कसोटी सामने जिंकले असून त्यांना 4 सामन्यात पराभव पत्करावा लागला आहेत तसेच 2 सामने अनिर्णित राहिले आहेत. कर्णधार म्हणून रोहितची कसोटी विजयाची टक्केवारी 71.42 आहे.
हेही वाचा –
टी20 विश्वचषकादरम्यान आर्थिक नुकसान झालं, ‘स्टार स्पोर्ट्स’नं आयसीसीकडे मागितली कोट्यवधी रुपयांची सवलत!
राहुल द्रविडच्या मुलाचा फ्लॉप शो जारी, बंगळुरूविरुद्ध संघाचा एकतर्फी पराभव
ठरलं! आयपीएल 2025 पूर्वी पंजाब किंग्ज या 5 खेळाडूंना रिटेन करणार, शिखर धवनचं भविष्य काय?