रोहित शर्मा हे आंतरराष्ट्रीय स्तरावरील खूप मोठे नाव आहे. मर्यादित षटकांत सलामीवीर म्हणून तो यशस्वी झाला आहे. तसेच सलामीवीर म्हणून कसोटी क्रिकेटमध्ये त्याला सलामीला फलंदाजी करण्यास सुरुवात केली आहे. तर आयपीएलमध्ये रोहित शर्माच्या नावाचे देखील दबदबा आहे. आयपीएलमध्ये रोहित शर्मा मुंबई इंडियन्स संघाचा कर्णधार आहे. त्याने आयपीएलमध्ये चार वेळा मुंबई इंडियन्सला विजेतेपद मिळवून दिले आहे.
या वेळी आयपीएलमध्ये रोहित शर्माकडून त्याच्या संघाला निश्चितच मोठ्या आशा असतील. रोहित शर्माकडे कर्णधारपदाशिवाय फलंदाजीमध्येही संघासाठी योगदान देण्याची जबाबदारी आहे. यावेळी सलामीच्या सामन्यात चेन्नई विरुद्ध तो फलंदाजीत अपयशी ठरला आणि त्याच्या संघालाही पराभव पत्करावा लागला. या लेखात रोहितच्या गेल्या तीन आयपीएल हंगामामधील कामगिरीचे विश्लेषण केले गेले आहे.
गेल्या ३ आयपीएलमध्ये रोहित शर्माची कामगिरी
वर्ष – २०१७ (आयपीएल सत्र १०)
या हंगामात मुंबई इंडियन्सने तिसऱ्यांदा आयपीएल विजेतेपद जिंकले. मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माने यावर्षी १७ सामने खेळले आणि ३ अर्धशतकांसह ३३३ धावा केल्या. त्याची प्रतिभा पाहता ही चांगली कामगिरी म्हणू शकत नाही. विशेष म्हणजे रोहित शर्माचा येथे स्ट्राइक रेट १२२ होता. या हंगामात तो कशी कामगिरी करतो ते पाहणे रंजक ठरेल.
वर्ष – २०१८ (आयपीएल सत्र ११)
यावर्षी, प्लेऑफच्या आधी मुंबई इंडियन्सच्या संघ स्पर्धेतून बाहेर झाला. या हंगामात रोहित शर्माने १४ सामन्यात २८६ धावा केल्या. या हंगामात तो फ्लॉप झाला होता. काही सामन्यात तो मधल्या फळीतही खेळताना दिसला. तेव्हा त्याची सर्वोच्च धावसंख्या ९४ होती. त्याच्या अपयशामुळे संघ स्पर्धेतून बाहेर पडला.
वर्ष – २०१९ (आयपीएल सत्र १२)
हा हंगाम पुन्हा मुंबई इंडियन्सने जिंकला. चेन्नई विरुद्ध चुरशीच्या झालेल्या अंतिम सामन्यात विजय मिळवत मुंबईने चौथ्यांदा आयपीएल चषकावर आपले नाव कोरले. यात रोहित शर्माची फलंदाजी उत्तम झाली. त्याने १५ सामन्यात १२९ च्या स्ट्राइक रेटने ४०५ धावा केल्या. त्याने २ अर्धशतकांसह वयक्तिक सर्वाधिक ६७ धावा केल्या. त्याच्या फलंदाजीतून सतत धावा येत राहिल्या आणि संघाने जेतेपदही जिंकले.