---Advertisement---

रोहितने चक्क खोटा कॅच घेत केलंय सेलिब्रेशन, चाहत्यांचाही उडाला गोंधळ; Video व्हायरल

On: रविवार, एप्रिल 17, 2022 3:50 PM
Rohit-Sharma
---Advertisement---

मुंबई। इंडियन प्रीमीयर लीग २०२२ हंगामात २६ वा सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्स संघात पार पडला. या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्सने १८ धावांनी विजय मिळवला. लखनऊचा हा हंगामातील चौथा विजय होता. मात्र, मुंबई इंडियन्ससाठी हा सलग ६ वा पराभव ठरला. या सामन्यात मुंबईचा कर्णधार रोहित शर्माची बॅटही थंड राहिली होती. पण, असे असले तरी या सामन्यादरम्यान, रोहित शर्मा थोडी मस्तीही करताना दिसला, ज्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.

रोहितची सामन्यादरम्यान मस्ती
या सामन्यात (MI vs LSG) मुंबईने नाणेफेक जिंकून लखनऊ संघाला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले होते. यावेळी सातव्या षटकात लखनऊ संघातील मधल्या फळीचा फलंदाज मनिष पांडे (Manish Pandey) फलंदाजी करत होता. तसेच हे षटक मुंबई संघाकडून मुरुगन अश्विन टाकत होता.

यावेळी षटकाचा अखेरचा चेंडू ऑफ स्टंप फुलटॉस होता, ज्यावर मनिष पांडेने जोरात फटका मारला. यावेळी तो चेंडू बॅटवर लागल्यानंतर लगेचच जमीनीवर टप्पा पडून उंच उडाला. त्यामुळे शॉर्ट कव्हर्समध्ये क्षेत्ररक्षण करणाऱ्या रोहित शर्माने (Rohit Sharma) तो चेंडू पकडला आणि गमतीने झेल घेतल्याचा आनंद साजरा करू लागला.

खरंतर रोहित हे सर्व मस्तीच्या मूडमध्ये करत होता. कारण, त्याने जो झेल घेतला होता तो एक टप्पा होता. पण रोहितची ही मस्ती पाहून चाहते गोंधळले की मनिषची विकेट गेली आहे की नाही. पण नंतर मनिष पुन्हा फलंदाजी करताना दिसल्याने रोहितची मस्ती असल्याचे लक्षात आले (Rohit Sharma take fake catch of Manish Pandey, prank video goes viral).

व्हिडिओ पाहाण्यासाठी येथे क्लिक करा

मुंबईचा सहावा पराभव
या सामन्यात लखनऊने २० षटांत ४ बाद १९९ धावा करत मुंबईसमोर २०० धावांचे आव्हान ठेवले होते. लखनऊकडून कर्णधार केएल राहुलने शतकी खेळी करताना १०३ धावा केल्या. तसेच मनिष पांडेने ३८ धावांची खेळी केली. त्यानंतर फलंदाजीसाठी उतरलेल्या मुंबईकडून सूर्यकुमार यादवने सर्वाधिक ३७ धावांची खेळी केली. तसेच डेवाल्ड ब्रेविसने ३१ धावांची खेळी केली. पण मुंबईला २० षटकांत ९ बाद १८१ धावा करता आल्या. त्यामुळे त्यांना १८ धावांनी पराभवाचा सामना करावा लागला.

महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा

महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

महत्त्वाच्या बातम्या –

PBKS vs SRH: मयंक ‘या’ कारणामुळे संघाबाहेर, तर शिखर करतोय पंजाबचे नेतृत्व; पाहा दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन

‘आम्ही १००० किलोमीटर गाडी चालवून आरसीबीसाठी आलोय’, म्हणणाऱ्या चाहत्यांना कार्तिकने दिले मन जिंकणारे उत्तर

IPL2022| गुजरात वि. चेन्नई सामन्यासाठीची ‘ड्रीम ११’, हे खेळाडू करून देऊ शकतात पैसा वसूल!

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---