भारत विरुद्ध इंग्लंड दरम्यान गुरुवार रोजी (१८ मार्च) ‘करा अथवा मरा’ची लढत झाली. अहमदाबाद येथे झालेली ही लढत (चौथा टी२० सामना) यजमानांनी ८ धावांनी जिंकली आणि मालिकेत २-२ ने बरोबरी साधली. या सामन्यातील शेवटच्या ४ षटकात विराट कोहली याच्या जागी रोहित शर्मा याने संघाचे कर्णधारपद सांभाळले आणि आपल्या चतुर नेतृत्त्वाने हातून निसटता सामना जिंकला.
टी२० स्वरुपातील इंडियन प्रीमियर लीगमध्ये आपल्या नेतृत्त्वाची छाप सोडणाऱ्या रोहितने भारतीय संघासाठीही कमाल करुन दाखवली. संघाचा नियमित कर्णधार विराटला १६ व्या षटकात दुखापत झाल्याने बाकावर बसावे लागले. यावेळी उपकर्णधार रोहितच्या हाती संघाच्या नेतृत्त्वाची सूत्रे देण्यात आली.
सतराव्या षटकात बदलला सामना
भारताच्या १८६ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंड १६ व्या षटकापर्यंत ४ बाद १४० धावा अशा स्थितीत होता. अशात विराटने रोहितवर अखेरच्या षटकात कर्णधारपदाची जबाबदारी सोपवली. रोहितने मध्यमगती गोलंदाज शार्दुल ठाकूरला १७ वे षटक टाकण्यासाठी बोलावले आणि गोलंदाजी करण्यापुर्वी त्याला कानमंत्र दिला.
यानंतर शार्दुलने पहिल्या चेंडूवर बेन स्टोक्सला सूर्यकुमार यादवच्या हातून झेलबाद केले. तर दुसऱ्या चेंडूवर कर्णधार ऑएन मॉर्गनचा अडथळा दूर केला. पुढे १८ व्या षटकात अष्टपैलू हार्दिक पंड्याने सॅम करनला स्वस्तात बाद केले. अशाप्रकारे अवघ्या २ षटकात सामन्याचा कायापालट झाला.
त्यानंतर शार्दुलच्या हाती २० वे आणि निर्णायक षटक देण्याचा धाडसी निर्णय रोहितने घेतला. शार्दुलने या षटकात २ वाइड, १ षटकार आणि चौकार देत सर्वांच्या हृद्याची धडधड वाढवली. परंतु १९.५ चेंडूवर ख्रिस जॉर्डनला बाद करत ८ विकेट्सने सामना जिंकवून दिला.
From one captain to other 🤝#INDvENG pic.twitter.com/5lmDuZfxP4
— ICC (@ICC) March 18, 2021
Rohit Sharma is the stand-in captain as Kohli goes off the field.
— Mumbai Indians (@mipaltan) March 18, 2021
मालिका विजय पाचव्या सामन्यावर निर्भर
इंग्लंडविरुद्धचा चौथा टी२० सामना जिंकत भारतीय संघ मालिकेत २-२ ने बरोबरीवर आहे. आता २० मार्च रोजी मालिकेतील पाचवा आणि निर्णायक सामना होईल. या सामन्याद्वारे टी२० मालिकेचा विजेता मिळेल.
महत्त्वाच्या बातम्या-
शार्दुल विरुद्ध खेळताना आर्चरची तुटली बॅट अन् ‘ते’ ट्विट झालं व्हायरल
जामनगरचा राजकुमार! एखाद्या राजवाड्यासारखा आहे रवींद्र जडेजाचा बंगला, पाहा फोटो
सोशल मीडिया पोस्टमुळे संकटात सापडले ‘हे’ क्रिकेटर; एकावर तर झाली होती १ वर्षाची बंदी