---Advertisement---

सोशल मीडिया पोस्टमुळे संकटात सापडले ‘हे’ क्रिकेटर; एकावर तर झाली होती १ वर्षाची बंदी

On: शुक्रवार, मार्च 19, 2021 7:28 AM
---Advertisement---

आजच्या युगात ट्विटर, फेसबुक, स्नॅपचॅट, इन्स्टाग्राम यांसारख्या सोशल मीडिया शिवाय जगणे सोपे नाही. जगातील जवळजवळ सर्व सामान्य व्यक्तीपासून सेलिब्रिटींपर्यत सर्वजण कोणत्या ना कोणत्या स्वरूपात सोशल मीडियाच्या माध्यमातून जोडलेले आहेत. बरेच क्रिकेटपटूसुध्दा सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव असतात.तर आज आम्ही तुम्हाला अशा क्रिकेटपटूंबद्दल सांगणार आहोत, ज्यांना सोशल मीडियावर त्यांच्या एका पोस्टसाठी शिक्षा भोगावी लागली होती.

रोरी बर्न्स
इंग्लंड संघाचे सलामी फलंदाज असलेले रोरी बर्न्स आणि इंग्लंडची महिला गोलंदाज अ‍ॅलेक्स हार्टली यांच्यामध्ये त्यांच्या इंग्लंड पुरूष संघाने नुकत्याच खेळल्या गेलेल्या भारताबरोबरच्या कसोटी मालिकेत चांगली खेळी न केल्यामुळे ट्विटरवरती वाद निर्माण झाला होता.

तिसर्‍या कसोटी सामन्यात भारताने इंग्लंडचा केलेला पराभव पाहून निराश इंग्लंडच्या महिला क्रिकेट खेळाडू अ‍ॅलेक्स हार्टलीने इंग्लंडच्या संघाच्या ट्वीटवर म्हटले आहे की, “इंग्लंडच्या महिला संघाचा सामना आज रात्री सुरू होण्याच्या ठीक आधी, इंग्लंडच्या पुरूष संघाच्या च्या टेस्ट दोन दिवसांत संपल्या आहेत”.

रोरी बर्न्स तिच्या टिप्पणीवर गप्प बसले नाहीत, आणि ट्विटवर प्रतिक्रिया देताना असे लिहिले की, “सर्व खेळाडूंनी महिलांच्या खेळांना पाठिंबा देण्यासाठीचा विचार केला तेव्हा अतिशय निराशाजनक वृत्ती स्वीकारली.” तथापि, रोरी बर्न्सचे हे ट्विट हटविण्यात आले आणि इंग्लंड बोर्डाने रॉरी बर्न्सला शिक्षा ठोठावताना सूचित केले.

डॅरेन ब्राव्हो
डॅरेन ब्राव्हो बर्‍याचदा वादाच्या भोवऱ्यात सापडलेला असतो, त्यावेळी वेस्ट इंडीजच्या कसोटी सामन्यातील सर्वात अंडररेटेड खेळाडू म्हणून त्याचे वर्णन केले जात होते. ही घटना 2016 झिम्बाब्वे दौऱ्यात जेव्हा ब्राव्होला वादग्रस्त वक्तव्याचा सामना करावा लागला होता. तेव्हा त्याला या स्पर्धेपूर्वी वगळण्यात आले होते. स्पर्धेला सुरुवात झाली आणि त्या काळात वेस्ट इंडीज क्रिकेट बोर्डाने त्याच्या संपूर्ण दौर्‍यासाठी बंदी घातली. खरं तर डॅरेन ब्राव्हो यांनी सोशल मीडिया ट्वीटरद्वारे वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्डाचे तत्कालीन अध्यक्ष डेव्ह कॅमेरून यांच्याविषयी वादग्रस्त विधान केले होते, त्यांनी त्यांच्या ट्विटमध्ये डेव्ह कॅमेरून यांना एक मूर्ख लिहिले होते.

एमिली स्मिथ
एमिली स्मिथ ही ऑस्ट्रेलियन संघाची खेळाडू आहे जी संघात विकेटकीपरची भूमिका बजावत आहे, ऑस्ट्रेलिया क्रिकेट बोर्डाने सोशल मीडियावर प्लेइंग इलेव्हन पोस्ट केल्यामुळे तिच्यावरती 1 वर्षासाठी बंदी घालण्यात आली होती. मागील वर्षी, बिग बॅश लीग खेळणारी क्रिकेटपटू, महिला खेळाडू एमिली स्मिथ, हिने सामन्याच्या 1 तासापूर्वी सोशल मीडियावर ट्विटरद्वारे होबर्ट हरिकेंस कडून खेळताना सिडनी थंडरविरूद्ध आपल्या संघाच्या प्लेइंग इलेव्हनला पोस्ट केल्यामुळे यासाठी सीएने त्यांना भ्रष्टाचारविरोधी दोषी ठरवत त्यांच्यावर 1 वर्षाची बंदी घातली आणि त्यांना कठोर शिक्षेची शिक्षा सुनावली.

केविन पीटरसन
इंग्लंडचा फलंदाज केविन पीटरसन हा जगातील निवडक फलंदाजांपैकी एक मानला जातो, केव्हिन पीटरसन हा त्याच्या काळातील धोकादायक हिटर फलंदाजांपैकी एक होता, त्याने आपल्या आयुष्यात उत्तम कामगिरी केली होती पण 2010 मध्ये त्याच्या खराब फॉर्ममुळे 5 एकदिवसीय आणि 2 सामन्यांच्या टी -20 मालिकेसाठी त्याला वगळण्यात आले होते, परंतु या बातमीला त्याने विकृत रूप देऊन ट्विटरद्वारे आपला राग सोशल मीडियावर लिहिला होता. त्याने लिहले होते की,” मला उन्हाळ्याची विश्रांती देण्यात आली असून, विश्वचषक टी-२० सामन्यामधून देखील मी बाजूला आहे.” सोशल मीडियावर या केलेल्या ट्विटची दखल घेत, ईसीबीने केव्हिन पीटरसनला शिक्षा दिली तसेच त्याला या अपमानास्पद ट्विटबद्दल माफी मागावी लागली होती.

महत्त्वाच्या बातम्या-

 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---