वनडे विश्वचषक 2023 फक्त 2 महिन्यांवर आला आहे. यावर्षी वनडे विश्वचषक भारतात होणार आहे. 5 ऑक्टोबर रोजी विश्वचषकाचा पहिला सामना खेळला जाणार आहे. तर, अंतिम सामना 19 नोव्हेंबरला होणार आहे. भारतीय संघ 8 ऑक्टोबरपासून आपल्या मोहिमेला सुरुवात करेल. याआधी कर्णधार रोहित शर्माने मोठे वक्तव्य केले आहे.
रोहित शर्मा (Rohit Sharma) आयसीसी सोबत बोलताना म्हणाला की, “आम्ही 2011 साली जिंकलो मात्र, मी त्या संघाचा भाग नव्हतो. साहजिकच संघाने ट्रॉफी जिंकली आणि ती सुंदर होती. त्यासोबत अनेक आठवणी जोडल्या गेल्या आहेत. तो इतिहास होता आणि तो छान होता. आशा आहे की यावेळीही आम्ही ट्रॉफी उचलू. विश्वचषकाशी अनेक आठवणी जोडलेल्या आहेत. माझा जन्म 1987 मध्ये झाला आणि मला आठवते की 1992 मध्ये पाकिस्तानने विश्वचषक जिंकला होता. पण अॅलन बॉर्डरला बाद करणारा भारताकडून अजय जडेजाने घेतलेला झेल खूपच चर्चेच होता.”
पुढे रोहित म्हणाला, “त्यानंतर 1996 च्या विश्वचषकात आपण उपांत्य फेरीत पराभूत झालो. पण प्रत्येक विश्वचषकाचा प्रत्येक क्षण मला आठवतो. जेव्हा आपण 1999 च्या विश्वचषकाचा विचार करतो तेव्हा हर्शल गिब्सचा झेल ही पहिली गोष्ट लक्षात येते. 2003 साली भारताने चमकदार कामगिरी करत विश्वचषकाच्या अंतिम फेरीत प्रवेश केला होता. सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) ज्या पद्धतीने फलंदाजी करायचे आणि धावा काढायचे ते खूप अविस्मर्नीय होते.”
कर्णधार पुढे म्हणाला, “त्यानंतर 2007 चा विश्वचषक आमच्यासाठी चांगला गेला नाही आणि आम्ही लीग टप्प्यासाठी पात्र ठरू शकलो नाही. हे खूप निराशाजनक होते. 2011 हे वर्ष आपल्या सर्वांसाठी खूप खास होते. त्याच्याशी माझ्या दोन भावना जोडल्या गेल्या आहेत. प्रथम, मी या संघाचा भाग नव्हतो, जे खूप निराशाजनक होते. यामुळे मला वाटले होते की आजच्या नंतर मी कधीच विश्वचषक पाहणार नाही. तर दुसरीकडे मला आठवते की टीम इंडिया खूप छान खेळत होती.” दरम्यान, वनडे विश्वचषकची ट्रॉफी सध्या जगभरात फिरवली जात आहे. ही ट्रॉफी बार्बाडोस मध्ये असताना राेहितने ट्रॉफी सोबत फोटो काढला आहे. (rohit sharma talk about world cup 2023)
महत्वाच्या बातम्या-
BREAKING! न्यूझीलंडच्या दिग्गजाने जॉईन केली ऑरेंज आर्मी, हैदराबाद फ्रँचायझीकडून ब्रायन लारा करारमुक्त
BREAKING: अखेर पाकिस्तानच ठरलं! वर्ल्डकपसाठी भारतात येण्यास सरकारने दिली परवानगी