कोलकाताच्या ईडन गार्डन स्टेडियमवर बुधवारी (१६ फेब्रुवारी) भारत विरुद्ध वेस्ट इंडिज (IND vs WI) यांच्यात टी२० मालिकेतील पहिला सामना झाला. या सामन्यात नाणेफेक जिंकून भारताने प्रथम गोलंदाजी निवडली आणि संघातील गोलंदाजांनी कर्णधार रोहित शर्मा (Captain Rohit Sharma) याचा हा निर्णय योग्यही ठरवला. भारतीय संघाने वेस्ट इंडिजच्या संघाला १५७ धावांवरच गुंडाळले. दरम्यान रोहितनेही एक अप्रतिम झेल टिपत (Rohit Sharma Catch) वेस्ट इंडिजला कमी धावसंख्येवर रोखण्यात बहूमुल्य योगदान दिले आहे.
त्याचे झाले असे की, पदार्पणवीर रवी बिश्नोई, हर्षल पटेल आणि इतर भारतीय गोलंदाजांच्या मदतीने भारतीय संघाने १८ व्या षटकापर्यंत वेस्ट इंडिजला ६ बाद १३५ धावा अशा स्थितीत पोहोचवले होते. त्यानंतर शेवटच्या २ षटकांत कर्णधार कायरन पोलार्ड आणि ओडेन स्मिथ फलंदाजीसाठी आले होते.
अशात डावातील शेवटचे षटक सुरू टाकण्यासाठी हर्षल पटेल आला होता. त्याच्या षटकातील शेवटच्या चेंडूवर ओडेन स्मिथने मिड ऑफच्या दिशेने चेंडू टोलवला. तिथेच क्षेत्ररक्षणासाठी उभा असलेल्या रोहितने चेंडूवर बारीक लक्ष ठेवले आणि चेंडू नजीक येताच त्याचा पाठलाग करत चपळाईने झेल घेतला. झेल टिपल्यानंतर रोहितचा तोल गेल्यामुळे तो मैदानावर पडला आणि एका पायावर घसरत गेला. परंतु त्याने चेंडू हातून सोडला नाही आणि त्वरित स्वतला सावरत मैदानावरून उठला.
https://twitter.com/Sachin_Ro45/status/1493972114042286081?s=20&t=ygWH3tYCsRYuz7rL4KFepg
Rohit Sharma catch 🥺🔥 pic.twitter.com/E6QeP3agv3
— Kanan Shah (@KananShah_) February 16, 2022
https://twitter.com/mahendra_vshnv/status/1493971758147584002?s=20&t=-xrKBB_PqxgkTkmo-hqMBQ
रोहितजवळच क्षेत्ररक्षणासाठी उभा असलेला सूर्यकुमार यादव कर्णधाराचा हा लई भारी झेल पाहून मात्र चकित झाला होता. रोहितच्या या अप्रतिम झेलचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. रोहितच्या कट्टर चाहत्यांनी त्याच्या या जबरदस्त झेलवरून त्याला अनफिट म्हणणाऱ्यांना चांगलेच टोलेही मारले आहेत.
What a catch by captain Rohit Sharma. pic.twitter.com/GBl0btxUcW
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) February 16, 2022
What a Catch🔥
Captain Rohit Sharma!! #INDvWI #INDvsWI https://t.co/dlhLkAQSsZ— Antimonitor (@uchihaCricket) February 16, 2022
दरम्यान वेस्ट इंडिजला १५७ धावसंख्येवर रोखण्यात पदार्पणवीर आणि युवा गोलंदाज रवी बिश्नोईचा मोठा हात राहिला. त्याने या डावात ४ षटके गोलंदाजी करताना केवळ १७ धावा देऊन २ महत्त्वपूर्ण विकेट्स घेतल्या. त्याच्या साथीला हर्षल पटेलने २ विकेट्सचे योगदान दिले. तसेच अनुभवी भुवनेश्वर कुमार आणि युझवेंद्र चहल यांनीही प्रत्येकी एक विकेट घेतली. तर दीपक चाहरनेही एका फलंदाजाला तंबूत धाडले.
महत्त्वाच्या बातम्या-