नुकताच इंडियन प्रीमियर लीग २०२२ चा (IPL 2022) मेगा लिलाव (Mega Auction) पार पडला आहे. बंगळुरू येथे झालेल्या या लिलावात सर्व सहभागी १० फ्रँचायझी प्रतिभाशाली खेळाडूंना ताफ्यात घेत मजबूत संघबांधणी करताना दिसले. शाहरुख खानची मालकी असलेल्या कोलकाता नाईड रायडर्स (केकेआर, KKR) संघाने भारताचा मधल्या फळीतील फलंदाज श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) याला १२ कोटी २५ लाखांना विकत घेतले होते. यानंतर केकेआरने अय्यरला कर्णधार म्हणून नियुक्त केले (KKR New Captain) आहे. आता अय्यरने त्याला मिळालेल्या या जबाबदारीवर आपली प्रतिक्रिया दिली (Shreyas iyer On KKR Captaincy) आहे.
अय्यरला विकत घेण्यासाठी मेगा लिलावात दिल्ली कॅपिटल्स, कोलकाता नाईट रायडर्स, गुजरात टायटन्स आणि लखनऊ सुपर जायंट्स संघांमध्ये स्पर्धा पाहायला मिळाली. तो २ कोटींच्या बेस प्राईजसह लिलावात उतरला होता. पण अखेर कोलकाता नाईट रायडर्सने १२ कोटी २५ लाखांना त्याला विकत घेतले होते.
Skipp-Iyer ???? Kolkata ???? Knight Riders
Stepping into the new era of #GalaxyOfKnights ???? @ShreyasIyer15 #IPL2022 #ShreyasIyer #KKR #CricketTwitter #AmiKKR pic.twitter.com/eEZjHLstyZ
— KolkataKnightRiders (@KKRiders) February 16, 2022
त्याने यापूर्वी दिल्ली कॅपिटल्स संघाचे नेतृत्त्व केले असून त्याने संघाला अंतिम फेरीतही पोहोचवले आहे. त्याच्या नेतृत्त्वाखाली दिल्लीचा संघ २०२० आयपीएल हंगामाचा उपविजेता राहिला होता. त्यामुळे केकेआरने त्याच्यावर ही जबाबदारी सोपवणे साहजिक होते.
केकेआरकडून मिळालेल्या जबाबदारीवर अय्यर म्हणाला की, केकेआरसारख्या प्रतिष्ठित संघाचे नेतृत्त्व करण्याची संधी मिळाल्यामुळे मला खूप सन्मानित वाटत आहे. आयपीएल एका स्पर्धेच्या रूपात विभिन्न देशांच्या आणि संस्कृतीच्या सर्वश्रेष्ठ खेळाडूंना एकत्र आणते. प्रतिभाशाली खेळाडूंचा भरणा असलेल्या या संघाचे नेतृत्त्व करण्यासाठी मी उत्सुक आहे.
???? Ladies and gentlemen, boys and girls, say hello ???? to the NEW SKIPPER of the #GalaxyOfKnights
অধিনায়ক #ShreyasIyer @ShreyasIyer15 #IPL2022 #KKR #AmiKKR #Cricket pic.twitter.com/veMfzRoPp2
— KolkataKnightRiders (@KKRiders) February 16, 2022
तसेच पुढे केकेआर संघाचे आभार व्यक्त करताना अय्यर म्हणाला की, मला केकेआर संघाचे नेतृत्त्व करण्याची संधी दिल्यामुळे केकेआरचे संघ मालक, व्यवस्थापक आणि सहयोगी कर्मचाऱ्यांचे आभार व्यक्त करतो. मला पूर्ण विश्वास आहे की, आम्ही आमचे लक्ष्य साध्य करण्यात यशस्वी होवू.
तसेच केकेआरचे मुख्य प्रशिक्षक ब्रेंडन मॅक्युलम यांनीही अय्यरविषयी आपले मत मांडले आहे. भारतीय संघाच्या भावी कर्णधारांपैकी एक असलेल्या अय्यरला केकेआरचा संघनायक बनवला गेल्याने मी खूप उत्साहित आहे, असे मॅक्युलम म्हणाले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
वेस्ट इंडिजविरुद्धची मालिका भुवनेश्वरसाठी ‘लास्ट चान्स’; होऊ शकते रहाणे-पुजारासारखी स्थिती
भारतीय दिग्गज म्हणतोय, “सनरायझर्समध्ये विलियम्सन बनणार बळीचा बकरा”
….आणि चारू शर्मांनी सुंदरची बोली वाढवली ५० लाखांनी! वाचा काय घडले लिलावावेळी






