भारत आणि श्रीलंका यांच्यातील पहिला वनडे सामना मंगळवारी (10 जानेवारी) गुवाहाटीमध्ये खेळला गेला. उभय संघांतील या सामन्यात भारताचा नियमित कर्णधार रोहित शर्मा याने संघात पुमरागमन केले. पण मागच्या नवडे सामन्यात संघासाठी द्विशतक करणारा ईशान किशन आणि मागच्या टी-20 सामन्यात शतक करणारा सूर्यकुमार यादव यांना प्लेइंग इलेव्हनमधून वगळण्यात आले. चाहत्ये संघ व्यवस्थापन आणि कर्णधाराच्या या निर्णयावर नाराजी व्यक्त करत आहेत.
रोहित शर्मा (Rohit Sharma) याच्यासाठी 2023 मधील हा त्याचा पहिलाच सामना होता. त्याने वर्षाच्या पहिल्या सामन्यात संघाला चांगली सुरुवात मिळवून दिली. मात्र शतकापासून अवघ्या 17 धावा दूर असताना दिलशान मधुशंका याने त्याला त्रिफळाचीत केले. तत्पूर्वी रोहित बांगलादेशविरुद्दच्या वनडे मालिकेतील दुसऱ्या सामन्यात दुखापतग्रस्त झाला होता. त्याच्या हाताच्या अंगठ्याला चेंडू लागल्याने तो मागच्या काही महत्वाच्या सामन्यात खेळू शकला नाही. पण मंगळवारी अखेर त्याने संघात पुनरागमन केले. पुणरागनाच्या सामन्यात रोहितचे वैयक्तिक प्रदर्शन अप्रतिम होते, पण सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) आणि ईशान किशन (Ishan Kishan) यांना संघातून वगळल्यामुळे सोशल मीडियावर नेटकरी रोहितसह संघ व्यवस्थापनावर संतापल्याचे पाहायला मिळत आहेत.
The two who have been dropped today! Ishan and Suryakumar Yadav! pic.twitter.com/1I7s9AFMhZ
— Prashant Kumar (@scribe_prashant) January 10, 2023
Team India showing their depth, to leave Ishan Kishan & Sky out of the playing 11, Crazy! 🫣 #INDvSL
— Amanda Wellington (@amandajadew) January 10, 2023
ईशान किशन मागच्या महिन्यात खेळल्या गेलेल्या बांगलादेशविरुद्धच्या तिसऱ्या वनडे सामन्यात जबरदस्त फॉरमध्ये दिसला. ईशानने या सामन्यात 210 धावा केल्या होत्या. तर दुसरीकडे सूर्यकुमार यादव देखील प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळण्यासाठी पात्र होता, पण त्यालादेखील संधी दिली गेली नाही. सूर्यकुमारने 7 जानेवारी (शनिवार) रोजी श्रीलंकेविरुद्धच्या तिसऱ्या टी-20 सामन्यात नाबाद 112 धावा कुटल्या होत्या. या दोघांचा फॉर्म पाहता श्रीलंकेविरुद्धच्या वनडे सामन्यात त्यांना खेळण्याची संधी मिळणे अपेक्षित होते. मात्र, प्रत्यक्षात तसे झाले नाही. केएल राहुल, विराट कोहली, श्रेयस अय्यर आणि स्वतः कर्णधार रोहित संघात परतल्यामुळे या दोघांना बेंचवर बसावे लागले. चाहते याच गोष्टीमुळे नाराज आहेत. सोशल मीडियावर नेटकरी चांगलेच संतापले असून संघाच्या या निर्णयावर नराजी व्यक्त करत आहेत.
Slightly uncomfortable with the prospect of watching an Indian team today without last ODI's double hundred scorer, Ishan Kishan, and last T20's centurion Suryakumar Yadav. Hope they remain motivated. #INDvSL
— Mohammad Kaif (@MohammadKaif) January 10, 2023
(Rohit Sharma Indian Team management is trolled social media for dropping Suryakumar Yadav and Ishan Kishan from the team)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
गिलने टीकाकरांना केले शांत! चौकारांचा पाऊस पाडत ‘या’ यादीत श्रेयस, विराटला टाकले मागे
श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्याच वनडेत कॅप्टन रोहितची धमाकेदार खेळी, गाठला 9500 धावांचा टप्पा