इंग्लंड दौऱ्यानंतर भारतीय संघ वेस्ट इंडीज दौऱ्यावर जाईल. वेस्ट इंडीजविरुद्धच्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठी बुधवारी (६ जुलै) भारतीय संघाची घोषणा केली गेली. रोहित शर्मा, विराट कोहली, जसप्रीत बुमराह आणि रिषभ पंतसारख्या महत्वाच्या खेळाडूंना या एकदिवसीय मालिकेत विश्रांती दिली गेली आहे. निवडर्त्यांच्या या निर्णयावर भारतीय क्रिकेटप्रेमी नाराज दिसत आहेत. चाहते सोशल मीडियावर प्रश्न विचारत आहेत की, या खेळाडूंना एवढ्या विश्रांतीची आवश्यकता आहे तरी कशासाठी?
वेस्ट इंडीजविरुद्धच्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेसाठी शिखर धवन (Shikhar Dhawan) संघाचे नेतृत्व करणार आहेत. तसेच अष्टपैलू रवींद्र जडेजा संघाचा उपकर्णधार आहे. बुधवारी या मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा होताच, काहीच वेळामध्ये सोशल मिडियावर याविषयी प्रतिक्रिया पाहायला मिळू लागल्या. वेगवेगळे मिम्सही जोरदार व्हायरल होत आहेत.
Rohit & Kohli should have been picked. When you go out of form, these are the kinds of series that you should utilise to get going. Considering the T20 World Cup this year and the 50 over WC next year, it's highly important both our heart and soul find their touch. https://t.co/1ELiVMmQGp
— Joshita SL 🏏 🇮🇳 (@Joshita_SL) July 6, 2022
Rohit & Kohli can play 15 games in IPL without taking rest but when it comes to international games they get tired and want to rest. I have not seen anyone getting back in form by taking rest #RohitSharma #Kohli #BCCI #Cricket
— Abhi D (@ADesai0823) July 6, 2022
https://twitter.com/ImVivaan45/status/1544681931282845696?s=20&t=lMntBnE1oRrt1NHCGdwyFQ
अनेक चाहत्यांनी असा प्रश्न उपस्थित केला आहे की, भारतीय संघाचे वरिष्ठ खेळाडू फक्त एक-दोन मालिकांसाठीच उपलब्ध आहेत का?. अनेक मिम्स बनवले गेले आहेत, ज्यात रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि विराट कोहली (Virat Kohli) यांच्यावर निशाणा साधला गेला आहे. अनेक नेटकऱ्यांनी वरिष्ट खेळाडूंना अशाप्रकारे वारंवार विश्रांती घेतल्यामुळेच त्यांचा फॉर्म बिघडत असल्याचे म्हटले आहेत आणि याच कारणास्तव संघाचे प्रदर्शनही बिघडले आहे. आयपीएल हंगाम संपूर्ण खेळतात, पण राष्ट्रीय संघाकडून खेळताना विश्रांती घेतात, असेही मत अनेकांनी व्यक्त केले आहे.
Rohit/Kohli when asked to take rest pic.twitter.com/n8AEYkUbOv
— Saahil Sharma (@faahil) July 6, 2022
BCCI to Rohit/Kohli after every series pic.twitter.com/TC3zLHxjIw
— Saahil Sharma (@faahil) July 6, 2022
दरम्यान, रोहित शर्मा, विराट कोहली आणि जसप्रीत बुमराहने आयपीएल २०२२ हंगामातील सर्व सामने खेळले. पण आयपीएल संपल्यानंतर दक्षिण आफ्रिकेविरुद्धची टी-२० मालिका सुरू झाली, तेव्हा या तिघांनाही विश्रांती दिली गेली. त्यानंतर इंग्लंडविरुद्धच्या कसोटी कोरोनामुळे रोहित शर्मा सहभागी होऊ शकला नाही. जसप्रीत बुमराह आणि विराटने हा सामना खेळला.
इंग्लंडविरुद्धच्या टी-२० आणि एकदिवसीय मालिकेत हे सर्व खेळाडू खेळताना दिसतील, पण त्यानंतर लगेच यांना पुन्हा एकदा विश्रांती दिली जाईल. तसे पाहिले तर संघातील वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती दिली जाणाची ही पहिली वेळ नाहीते. यापूर्वीही अनेकदा संघातील खेळाडूंना विश्रांती दिली जात होती. परंतु राहुल द्रविड प्रशिक्षक बनल्यापासून हा प्रकार वारंवार होताना दिसत आहे.
वेस्ट इंडिजविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी भारतीय संघ:
शिखर धवन (कर्णधार), रवींद्र जडेजा (उपकर्णधार), ऋतुराज गायकवाड, शुभमन गिल, दीपक हुड्डा, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, इशान किशन (यष्टीरक्षक), संजू सैमसन (यष्टीरक्षक), शार्दुल ठाकुर, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, आवेश खान, प्रसिद्ध कृष्णा, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंह.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
संघ व्यवस्थापनापुढे पेच, पहिल्या टी२० सामन्यात ‘या’ तिघांपैकी कोण असेल प्लेइंग इलेव्हनचा भाग?
विंडीजविरुद्ध गब्बरला कर्णधार करुन बीसीसीआयने दाखवला ५ कर्णधारांना बाहेरचा रस्ता?