भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा रविवारी (30 एप्रिल) आपला 36वा वाढदिवस साजरा करत आहे. वाढदिवशी रोहितला जगभरातील चाहते आणि क्रिकेटपटूंकडून शुभेच्छा येत आहेत. यादरम्यानच रोहितचा जुना सहकारी खेळाडू तिरुमलासेट्टी सुमन याने एक खास खुलासा केला आहे. रोहित आणि सुमन आयपीएलमध्ये डेक्कन चार्जर्स संघासाठी एकत्र खेळले आहेत. सुमनने सांगितल्यानुसार जगाच्या नजरेत येण्याआधीच रोहित कर्णधार बनण्यासाठी इच्छूक असल्याचे त्याने हेरले होते.
रोहित शर्मा (Rohit Sharma) एक उत्तम कर्णधार असल्याचे सर्वांनाच माहिती आहे. त्याच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्सने आतापर्यंत पाच आयपीएल ट्रॉफी जिंकल्या आहेत. तिरुमलासेट्टी सुमन याने एक खुलासा केला की, रोहित मुंबई इंडियन्सप्रमाणे डेक्कन चार्जर्स संघाचेही नेतृत्व करू इच्छित होता. मात्र, त्याला ही संधी मिळाली नाही.
जगाच्या खूप आधी रोहितमधील कर्णधारपादाची योग्यता ओळखली होती – तिरुमलासेट्टी सुमन
एका वृत्तसंस्थेला नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत सुमन (Tirumalasetti Suman) म्हणाला, “तो एक खूपच गतीमान खेळाडू होता आणि फलंदाजी करताना तो कर्णधाराप्रमाणे विचार करायचा. तेव्हा संघाचे नेतृत्व करणाऱ्या ऍडम गिलक्रिस्ट यालाही रोहित सल्ला द्यायचा. मला आधीपासून माहिती होते की, तो एक चांगला कर्णधार बनू शकतो.”
“मला जिथपर्यंत माहिती आहे, आयपीएल 2010मध्ये रोहित शर्मा डेक्कन चार्जर्स संघाचे नेतृत्व करू इच्छित होता. फ्रँचायझीनेही त्याला कर्णधारपदासाठी शब्द दिला होता. पण नंतर काय झाले मला याची कल्पना नाही. या फ्रँचायझीने सर्व खेळाडूना करारमुक्त केले आणि डेक्कन चार्जर्सचे पुढे काय झाले, हे आपल्या सर्वांना माहिती आहे. नंतर मी रोहित आणि सायमंड्स मुंबई इंडियन्समध्ये आलो.”
दरम्यान, रोहित शर्मा डेक्कन चार्जर्स संघासाठी आयपीएलमध्ये तीन हंगाम खेळला. यादरम्यान त्याने 45 सामन्यांमध्ये 1170 धावा केल्या होत्या. आयपीएल 2009मध्ये ऍडम गिलक्रिस्ट याच्या नेतृत्वातील डेक्कन चार्जर्स संघाने आयपीएलची ट्रॉफी जिंकली होती. या विजयात रोहित शर्माची भूमिका महत्वाची राहिली होती. (Rohit Sharma wanted the Deccan Chargers captaincy, said his former teammate Tirumalasetti Suman )
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
चेपॉकवर चेन्नई पुन्हा चीत! अखेरच्या चेंडूवर पंजाबने पार केले 201 धावांचे आव्हान
IPL 2023: 1000 व्या आयपीएल सामन्यात राजस्थानने जिंकला टॉस, यजमान मुंबई करणार प्रथम गोलंदाजी