दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात रोहित शर्माने क्षेत्ररक्षण करताना असे काही केले, ज्यामुळे त्याचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. मालिकेतील पहिल्या आणि त्यानंतर आता दुसऱ्या टी-20 सामन्यात विजय मिळवल्यानंतर भारताने या मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली आहे. उभय संघातील दुसरा सामना गुवाहाटीच्या बारसापारा क्रिकेट स्टेडियममध्ये खेळला गेला. चाहत्यांना या सामन्यात दोन्ही संघांकडून दमदार फलंदाजीचे प्रदर्शन पाहायला मिळाले.
भारतीय कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) याने नाणेफेक गमावल्यानंतर संघाला प्रथम फलंदाजी करावी लागली. परंतु संघातील फलंदाजांनी ज्या पद्धतीचे प्रदर्शन केले, त्यावरून दक्षिण आफ्रिकी कर्णधाराने प्रथम गोलंदाजीचा घेतलेला निर्णय चुकीचा ठरला. प्रथम फलंदाजी करताना भारताने 3 विकेट्सच्या नुकसानावर 237 धावा केल्या. प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिकी संघाने देखील कडवे आव्हान दिले, पण त्यांना विजय मिळवता आला नाही. आफ्रिकी संघाने तीन विकेट्सच्या नुकसानावर 221 धावांपर्यंत मजल मारली होती. पण विजयासाठी 16 धावा कमी पडल्यामुळे भारताने विजय मिळवला. आफ्रिकी संघ फलंदाजी करत असताना रोहितच्या नाकातून रक्त येत असल्याचे दिसले, पण तरीही त्याने मैदान सोडले नाही.
दक्षिण आफ्रिकी संघ फलंदाजी करत असताना रोहितच्या नाकातून रक्त येत होते. तरीदेखील रोहितने मैदानातून माघार घेतली नाही. तो रुमालाने हे रक्त पुसत राहिला आणि खेळाडूंना सुचाना देखील करत होता. असे असले तरी, थोड्या वेळाने तो काही काळासाठी मैदानातून बाहेर गेला होता. नाकातून रक्त येत असताना देखील रोहित मैदानाबाहेर जात नसल्यामुळे अनेकांना आश्चर्य वाटले. अनेक चाहते सोशल मीडियावर रोहितच्या या कृतीचे कौतुक करत आहेत. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होताना दिसत आहे.
The commitment and passion of Rohit Sharma. Hats off Captain. https://t.co/bFk82x2tQX
— Tanuj Singh (@ImTanujSingh) October 2, 2022
तत्पूर्वी भारतीय संघाने मालिकेतील पहिल्या सामन्यात 8 विकेट्सने विजय मिळवला होता. आता मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना मंगळवारी, 4 ऑक्टोबर रोजी इंदोरमध्ये खेळला जाणार आहे. माजी कर्णधार आणि दिग्गज फलंदाज विराट कोहली (Virat kohli) या सामन्यात खेळणार नाहीये. विराट त्याच्या जुन्या अंदाजात पुन्हा खेळू लागला आहे, पण आगामी टी-20 विश्वचषकाच्या पार्श्वभूमीवर त्याला संघातून विश्रांती दिली गेली आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
भारताचा ‘हा’ खेळाडू टी-20 विश्वचषक गाजवणार, गिलक्रिस्टने टॉप फाईव्ह खेळाडूंमध्ये दिलीये संधी
ब्रेकिंग: आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या टी20 सामन्यातून विराट-राहुलची एक्झिट! जाणून घ्या नेमके कारण