---Advertisement---

रोहितचे आपलेच बनले दुश्मन! ईशानचा ‘तो’ शॉट ठरला मुंबईच्या पराभवाचे कारण

---Advertisement---

रविवारी (२६ सप्टेंबर) पार पडलेल्या मुंबई इंडियन्स आणि राॅयल चॅलेंजर्स बेंगलोर यांच्यातील सामन्यात मुंबईचा लाजीरवाणा पराभव झाला. सामन्यात मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा बाद झाल्यानंतर संघाला गळती लागली आणि परिणामी संघ १११ धावांवर सर्वबाद झाला. दरम्यान रोहित चांगल्या लयात दिसत होता, पण खेळपट्टीवर ईशान किशनच्या एका शाॅटमुळे रोहितला दुखापत झाली होती. दुखापत जास्त गंभीर नव्हती, पण त्यानंतर दोन चेंडूंमध्ये संघाने रोहितची विकेट गमावली आणि संघाचा पराभवाच्या दिशेने प्रवास सुरू झाला.

ईशान किशनच्या शाॅटमुळे रोहितला दुखापत तर झालीच होती, पण मुंबई इंडियन्सच्या पराभवातही हा शाॅट कारणीभूत ठरला आहे. कारण रोहितनंतर संघाचा एकही फलंदाज चांगली कामगिरी करू शकला नाही. यापूर्वी कोलकाता नाईट रायडर्सविरुद्धच्या सामन्यातही रोहितला अशाचप्रकारे दुखापत झाली असती, पण त्यावेळी तो बचावला होता. त्यावेळी क्विंटन डी काॅकने मारलेला शाॅट वेगाने रोहितच्या दिशेने आला होता, पण रोहित योग्य वेळी खाली पडला आणि वाचला होता.

ही घटना सामन्याच्या १० व्या षटकात झाली. या षटकात ग्लेन मॅक्सवेल गोलंदाजी करत होता. षटकाच्या चौथ्या चेंडूवर ग्लेन मॅक्सवेलने स्टंपच्या बाहेर जाऊन एक दमदार शाॅट मारला. मात्र, त्याने मारलेला चेंडू सरळ रोहितच्या दिशेने गेला. अशात चेंडू तोंडावर लागू नये यासाठी रोहितने त्याचा हात मध्ये घातला आणि तेंडू त्याच्या हातावर जोरात लागला. चेंडू लागल्यानंतर रोहित वेदनेमध्ये दिसत होता. त्याने ग्लोव्हज काडून हाताकडे पाहिले आणि संघाच्या फिजियोची मदत हेतली. फिजियोने त्याला लागलेल्या जागेवर स्प्रे केला आणि रोहितच्या वेदना कमी झाल्याचे दिसले. यादरम्यान ईशानही रोहितकडे पाहून चिंतेत पडला होता.

वेदना कमी झाल्यानंतर रोहित खेळण्यासाठी पुन्हा तयार झाला. पुढच्या चेंडूवर ईशान किशनने त्याला स्ट्राईक दिली. मात्र, रोहितने मोठा शाॅट खेळण्याचा प्रयत्न केला आणि सीमारेषेजवळ क्षेत्ररक्षणासाठी उभा असलेल्या देवदत्त पडिक्कलने त्याचा चेंडू झेलला. रोहितने या सामन्यात २८ चेंडूमध्ये ५ चौकार आणि १ षटकाराच्या मदतीने ४३ धावा केल्या. बाद झाल्यावर मोठा शाॅट खेळण्याच्या प्रयत्नावरून समालोचक सुनील गावसकर यांनी त्याला सुनावले. त्यांनी सांगितले की, रोहितने थोडी वाट पाहायला हवी होती. दुखापत झाल्यानंतर आता ब्लड सर्क्युलेशन सेटल झाले नव्हते.

https://twitter.com/Aryansh_im_/status/1442361153036828675

सामन्यात रोहितने विकेट गमावल्यानंतर मुंबईचे फलंदाज एकापाठोपाठ एक बाद होत गेले. एका विकेटच्या नुकसानावर संघाच्या ७९ धावा झावा होत्या आणि नंतर पाच विकेटच्या नुकसानावर ९७ धावा, अशी संघाची स्थिती झाली होती. रोहितच्या विकेटनंतरच्या ४.१ षटकांमध्ये संघाने केवळ १८ धावा केल्या आणि सूर्यकुमार यादव, ईशान किशन आणि कृणाल पांड्या यांनी विकेट्स गमावले.

महत्त्वाच्या बातम्या-
-मुंबई इंडियन्सचे ग्रह फिरले, रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरविरुद्धच्या दारुण पराभवानंतर गुणतालिकेत ‘मोठा’ धक्का
-हॅट्रिक पूर्ण करताच हर्षल मैदानावर सुसाट धावत सुटला, आरसीबीचा ‘विजयी क्षण’ एकदा पाहाच
-ॲक्शनला रिॲक्शन! षटकार मारल्यानंतर खुन्नस देणाऱ्या भरतची विकेट घेऊन चाहरने केला असा जल्लोष

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---