सध्या भारत आणि इंग्लंड संघामध्ये ४ ऑगस्ट पासून कसोटी सामन्यांची मालिका सुरू झाली आहे. पहिल्या कसोटी सामन्यात इंग्लंड संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. पण सामन्याच्या पहिल्याच दिवशी इंग्लंड संघाचे सर्व गडी १८३ धावांवर बाद झाले. त्यानंतर भारतील संघाकडून सलामीवीरांनी चांगली सुरुवात केली होती. मात्र, असे असतानाही रोहित शर्माने आपलाच आवडता फटका खेळण्याच्या नादाव विकेट गमावली.
या सामन्यात भारतीय संघासाठी पहिल्या डावात सलामीवीर फलंदाज म्हणून केएल राहुल आणि रोहित शर्मा मैदानात उतरले होते. या दोघांनी ३७ व्या षटकापर्यंत इंग्लंडच्या गोलंदाजांना यश मिळू दिले नव्हते. ते शतकी भागीदारीच्याही नजीक होते. मात्र, ३८ व्या षटकात ९७ धावांची भागीदारी झाली असताना तिसऱ्या चेंडूवर रोहित ३६ धावांवर बाद झाला आणि भारताला पहिला धक्का बसला.
झाले असे की ऑली रॉबिन्सनने गोलंदाजी केलेल्या ३८ व्या षटकातील तिसरा चेंडू उसळी घेणारा होता. यावेळी रोहित पुल मारण्याच्या प्रयत्नात होता. पण चेंडू त्याच्या बॅटच्या पुढच्या बाजूला लागला आणि बॅकवर्ड स्क्वेअर लेगला उभ्या असणाऱ्या सॅम करनने त्याने मारलेला चेंडू झेलला. त्यामुळे रोहितला माघारी परतावे लागले.
A big wicket just before the lunch break! 👏
Scorecard/Clips: https://t.co/5eQO5BWXUp#ENGvIND pic.twitter.com/Mi1vnwaKjY
— England Cricket (@englandcricket) August 5, 2021
भारताची मधली फळी कोलमडली
रोहित शर्मा बाद झाल्यानंतर भारताची मधली फळी लवकर कोलमडली. चेतेश्वर पुजारा ४ धावांवर, विराट कोहली शुन्यावर, तर अजिंक्य रहाणे ५ धावांवर बाद झाला. त्यामुळे दुसऱ्या दिवशी पावसामुळे खेळ थांबला, तेव्हा भारताने ४६.४ षटकात ४ बाद १२५ धावा केल्या होत्या. दुसऱ्या दिवसाखेर सलामीवीर केएल राहुल ५७ धावांवर नाबाद आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
“टीम इंडियाने कसोटी चॅम्पियशीप फायनलमधील चूका सुधारल्या”, माजी दिग्गज वेगवान गोलंदाजांवर खूश
ऑलिम्पिकमध्ये ऐतिहासिक विजयानंतर गोलपोस्टवर का बसला श्रीजेश? स्वत:च केलाय खुलासा