चेन्नई। एमए चिदंबरम स्टेडियमवर भारत विरुद्ध इंग्लंड संघात ४ सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना शनिवारपासून (१३ फेब्रुवारी) सुरु झाला. या सामन्यात भारताचा सलामीवीर फलंदाज रोहित शर्माने दिडशतकी खेळी केली आहे. हे दिडशतक त्याच्यासाठी खास ठरले आहे. कारण रविवारी(१४ फेब्रुवारी) वॅलेंटाईन्स डे आहे आणि त्याची पत्नी तो शतक करण्यावेळी स्टेडियममध्ये उपस्थित होती.
रोहितने या सामन्यात भारताकडून पहिल्या डावात २३१ चेंडूत १६१ धावा केल्या. यात त्याने १८ चौकार आणि २ षटकार मारले. त्याने त्याचे शतक १३० चेंडूत पूर्ण केले. हे शतक तो करत असताना त्याची पत्नी रितीका देखील स्टेडियममध्ये उपस्थित होती. त्यामुळे अनेकदा कॅमेरा तिचे हावभाव टिपत होता.
रितीका स्टेडियममध्ये उपस्थित राहण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही ती अनेकदा स्टेडियममध्ये दिसली आहे. विशेष म्हणजे याआधीही रोहितने रितीका स्टेडियममध्ये उपस्थित असताना शतकी खेळी केल्या आहेत. त्यामुळे ती त्याच्यासाठी लेडीलक असल्याच्या चर्चांना सध्या सोशल मीडियावर उधाण आले आहे.
एका चाहत्याने तर एक खास आकडेवारी सोशल मीडियावर शेअर केली आहे. पत्नी स्टेडियममध्ये उपस्थित असताना सर्वाधिक शतके करणाऱ्या भारतीय खेळाडूंची ही आकडेवारी आहे. चाहत्याने शेअर केलेल्या या आकडेवारीनुसार भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने त्याची पत्नी अनुष्का शर्मा स्टेडियममध्ये असताना १२ शतके केली आहे. तर रोहितने रितिकाच्या स्टेडियममधील उपस्थितीत ७ शतके केली आहे. तसेच शिखर धवनने त्याची पत्नी आयेशा स्टेडियममध्ये उपस्थित असताना ५ शतके केली आहेत.
Most 💯 in the presence of wife
V Kohli 12
R Sharma 7
S Dhawan 5
Y Chahal 0— Sanket (@sanket7262) February 13, 2021
काही चाहत्यांनी म्हटले आहे की रोहितने एक दिवस आधीच रितीकाला वॅलेंटाईन्स डेची भेट दिली आहे.
https://twitter.com/Pkchaturvedi567/status/1360540267334389760
What a brilliant inning @ImRo45 👑
150* 😍 let's make it double #ENGvIND #ritika #INDvsENG pic.twitter.com/fZloaa0Zbb— saivinay kanjari (@Ksaivinay2) February 13, 2021
Ritika ❤🙌 #rohit #RohitSharma pic.twitter.com/cYvBFVGUKY
— Zishan khan 🇮🇳 (@Being_zishan) February 13, 2021
लग्नाच्या वाढदिवशी द्विशतक –
रोहितने २०१७ साली १३ डिसेंबरला श्रीलंकेविरुद्ध मोहाली येथे पार पडलेल्या वनडे सामन्यात १५३ चेंडूत नाबाद २०८ धावांची खेळी केली होती. हे त्याचे वनडे कारकिर्दीतील तिसरे द्विशतक होते. विशेष म्हणजे हे त्याने त्याच्या लग्नाच्या वाढदिवसाच्या दिवशी द्विशतक केले होते. त्यावेळीही रितिका स्टेडियममध्ये उपस्थित होती.
रोहितचे ४० वे शतक –
रोहितने इंग्लंडविरुद्ध चेन्नईत होत असलेल्या दुसऱ्या कसोटीत केलेले शतक हे त्याच्या कसोटी कारकिर्दीतील एकूण सातवे शतक आहे. तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील चाळीसावे शतक आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये चाळीस शतके करणारा तो भारताचा चौथा क्रिकेटपटू ठरला आहे. याआधी असा पराक्रम सचिन तेंडुलकर, विराट कोहली आणि राहुल द्रविडने केला आहे. सचिनने १०० शतके, विराटने ७० शतके आणि द्रविडने ४८ शतके केली आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
इंग्लंडसह ‘या’ ४ संघांविरुद्ध रोहितचा दबदबा, फक्त कसोटी नव्हे तर टी२० आणि वनडेतही केलीय सेंचूरी
युवा खेळाडूंसाठी खुशखबर! आता ‘या’ राज्यांमध्येही सुरू होणार एमएस धोनी क्रिकेट अकादमी
शतक एक पराक्रम अनेक! रोहित शर्माने शतकी खेळीसह केले ‘हे’ मोठे विक्रम