भारतीय कसोटी संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे. या दौऱ्यादरम्यान भारतीय संघातील खेळाडू विश्रांतीच्या मिळालेल्या वेळात एकत्र फिरताना दिसत आहेत. तसेच या दौऱ्यासाठी खेळाडूंबरोबर त्यांच्या कुटुंबातील सदस्य देखील आहेत. नुकताच, रोहित शर्माची पत्नी रितिका सजदेहने सोशल मीडियावर असाच एक फोटो शेअर केला आहे.
रितिकाने शेअर केलेल्या फोटोमध्ये तिच्यासह रोहित शर्मा आणि शार्दुल ठाकूर तसेच रितिकाचा भाऊ कृणाल दिसून येत आहेत. या फोटोला रितिकाने कॅप्शन दिले आहे की ‘माय ३ फेव्हरिट बॉईज (माझे ३ आवडती मुलं)’. रितिकाने दिलेल्या कॅप्शनला चाहते चांगलीच पसंती दर्शवत आहेत. चाहते या फोटोवर अनेक गमतीशीर कमेंट करत आहेत. तसेच फोटोला भरपूर लाईक्स मिळत आहेत.
एका सोशल मीडिया वापरकर्त्याने कमेंट करत लिहिले की, “शार्दुल चाचू शर्मा कुटुंबासोबत कसे हँग आउट करतो, हे मला प्रचंड आवडते.” दुसऱ्या चाहत्याने कमेंट करत लिहिले की, “तुम्हाला खूप गर्व असेल की, जगातला सर्वश्रेष्ठ फलंदाज तुमचा पती आहे.”
एका चाहत्याने फोटोवर कमेंट केली आणि लिहिले की, “अरे आता समजले, २०१९ आयपीएल फायनल ठाकूर शेवटच्या चेंडूवर बाद कसा झाला.”
https://www.instagram.com/p/CSsKkR0oMXK/
भारतीय संघ सध्या इंग्लंडविरुद्ध पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळत आहे. या मालिकेतील पहिला कसोटी सामना अनिर्णित राहिला. पण भारताने दुसरा सामना १५१ धावांनी जिंकला आणि मालिकेत १-० अशी आघाडी घेतली.
लॉर्ड्सवर पार पडलेल्या या दुसऱ्या सामन्यात केएल राहुलने शानदार शतक झळकावले. लॉर्ड्स कसोटीत भारताच्या पहिल्या डावादरम्यान राहुलने २५० चेंडूत १२९ धावा केल्या. त्याचबरोबर रोहितने पहिल्या डावादरम्यान १४५ चेंडूत ८३ धावा करून भारताला पहिल्या डावात चांगली सुरुवात करून दिली होती. त्याने दुसऱ्या डावात ३६ चेंडूत २१ धावा केल्या.
वेगवान गोलंदाज शार्दुल दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी भारतीय प्लेइंग इलेव्हनमध्ये नव्हता. मालिकेतील तिसरा कसोटी सामना २५ ऑगस्टपासून सुरू होईल आणि सामना हेडिंग्ले क्रिकेट मैदानावर खेळला जाईल.
महत्त्वाच्या बातम्या –
टी२० विश्वचषकासाठी हार्दिक पंड्याचे स्थान धोक्यात, ‘हे’ ३ खेळाडू करू शकतात पत्ता कट
“बुमराह फलंदाजीसाठी आला तेव्हा, रिषभ पंतपेक्षाही जास्त क्षेत्ररक्षक सीमारेषेवर होते”
टी२० विश्वचषकात खेळताना दिसणार का फिंच आणि स्मिथ? ऑसी कर्णधाराने दिले दुखापतीबद्दल अपडेट






