इंग्लंड विरुद्ध भारत या दोन्ही संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने १५१ धावांनी विजय मिळवला. या सामन्यातील शेवटच्या दिवशी (१६ ऑगस्ट) भारतीय संघ बॅकफूटवर होता. परंतु जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमी यांनी चौफेर फटकेबाजी करून भारतीय संघाला जोरदार पुनरागमन करून दिले होते.
ज्यावेळी जसप्रीत बुमराह फलंदाजी करण्यासाठी आला त्यावेळी रूटने ज्या रणानीतीचा वापर केला होता, त्यावर अनेक दिग्गजांनी टीका केली आहे. दरम्यान, माजी इंग्लिश कर्णधारानी देखील रूटच्या रणनीतीवर प्रश्न उपस्थित केले आहेत.
दुसऱ्या कसोटी सामन्याच्या शेवटच्या दिवशी (१६ ऑगस्ट) रिषभ पंत आणि ईशांत शर्मा बाद झाल्यानंतर असे वाटू लागले होते की, भारतीय संघ हा सामना गमावणार; परंतु, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमी यांनी तुफान फटकेबाजी सुरू केल्यानंतर जो रुटने रक्षात्मक रणनीतीचा अवलंब करत सर्व खेळाडूंना सीमारेषेवर पाठवून दिले होते. ज्यामुळे जसप्रीत बूमराह आणि मोहम्मद शमी यांना धावा करणे सोपे जात होते.
शमीने या डावात नाबाद ५६ धावांची खेळी केली होती. तर बुमराहने ३४ धावांची खेळी केली होती.दोघांनी मिळून ८९ धावांची भागीदारी केली होती.(Micheal Vaughan criticized joe root tactics)
लॉर्ड्स कसोटी संपल्यानंतर मायकल वॉन यांनी बीबीसीसोबत बोलताना म्हटले होते की, “जेव्हा जसप्रीत बुमराह फलंदाजी करण्यासाठी आला होता, त्यावेळी रिषभ पंत पेक्षाही जास्त क्षेत्ररक्षक सीमारेषेवर लावण्यात आले होते. जर तुमच्याकडे जो रूट आणि जेम्स अँडरसन सारखे अनुभवी खेळाडू आहेत, ज्यांनी १०० पेक्षा अधिक कसोटी सामने खेळले आहेत. तर तुम्ही अशी चूक कशी काय करू शकता. ही रणनीती पूर्णपणे चुकीची ठरली.”
भारतीय संघाने १५१ धावांनी मिळवला विजय
भारतीय संघाने दिलेल्या धावांचा पाठलाग करताना इंग्लंडचे सलमीवीर फलंदाज लवकर माघारी परलते होते. त्यानंतर कर्णधार रूटने एकहाती झुंज देण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्याला देखील मोठी खेळी खेळता आली नाही, तो अवघ्या ३३ धावा करत माघारी परतला.
त्यानंतर जोस बटलरने शेवटी २५ धावांची खेळी केली. परंतु त्याला देखील हा सामना वाचवता आला नाही. अखेर भारतीय गोलंदाजांच्या आक्रमक गोलंदाजी समोर इंग्लिश फलंदाजांचा डाव पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे१२० धावांत कोसळला. हा सामना भारतीय संघाने १५१ धावांनी आपल्या नावावर केला.
महत्त्वाच्या बातम्या –
टी२० विश्वचषकात खेळताना दिसणार का फिंच आणि स्मिथ? ऑसी कर्णधाराने दिले दुखापतीबद्दल अपडेट
‘मुळीच असं समजू नका की, खेळ इथेच संपला आहे’, माजी इंग्लिश कर्णधाराची भारतीय संघाला चेतावणी
तुमच्याही लक्षात आली नसेल ही बाब, लॉर्ड्स कसोटीतील रोहित शर्माचा ‘तो’ व्हिडिओ प्रचंड व्हायरल






