---Advertisement---

‘मुळीच असं समजू नका की, खेळ इथेच संपला आहे’, माजी इंग्लिश कर्णधाराची भारतीय संघाला चेतावणी

On: बुधवार, ऑगस्ट 18, 2021 11:15 PM
England-vs-India
---Advertisement---

लॉर्ड्सच्या मैदानावर इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यातील ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा कसोटी सामना पार पडला. या सामन्यात यजमानांना १५१ धावांनी पराभवाचा सामना करावा लागला आहे. यासह भारतीय संघाने या मालिकेत १-० ने आघाडी घेतली आहे. भारतीय संघ या मालिकेत वरचढ दिसत असल्याचे अनेकांनी म्हटले आहे. तर दुसरीकडे माजी इंग्लिश कर्णधाराला विश्वास आहे की, इंग्लंड संघ जोरदार पुनरागमन करेल.

इंग्लंड संघासाठी ९६ कसोटी सामने खेळलेल्या माजी कर्णधार नासिर हुसेन यांनी डेली मेल सोबत बोलताना म्हटले की, “हे विसरू नका की, इंग्लंडने लॉर्ड्स कसोटीत चांगले क्रिकेट खेळले होते. जेव्हा सोमवारी (१६ ऑगस्ट) रिषभ पंत फलंदाजीला आला होता. तेव्हा सर्वांना असेच वाटत होते, इंग्लंड या मालिकेत १-० ची आघाडी घेईल. भारताच्या फलंदाजीमध्ये देखील कमकुवतपणा आहे.”

तसेच ते पुढे म्हणाले की, “इंग्लंड या सामन्यात विजय मिळवू शकला नाही कारण, इंग्लंडकडून एकटा रूट धावा करत आहे. इंग्लंडचे गोलंदाज दुखापतग्रस्त होत असताना ऑली रॉबिन्सनने चांगली कामगिरी केली आहे. असा मुळीच विचार करू नका की, खेळ इथेच संपला आहे. परंतु, इंग्लंडच्या फलंदाजांनी धावा करणे आवश्यक आहे.” नासिर हुसेन यांना विश्वास आहे की, इंग्लंड संघ नक्की पुनरागमन करेल.(Game is not over yet, says Nasir Hussain)

लॉर्ड्स कसोटीत भारतीय संघाचा ऐतिहासिक विजय
भारतीय संघाने दिलेल्या २७२ धावांचा पाठलाग करताना इंग्लंडचे सलमीवीर फलंदाज लवकर माघारी परलते होते. त्यानंतर कर्णधार रूटने एकहाती झुंज देण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्याला देखील मोठी खेळ खेळता आली नाही, तो अवघ्या ३३ धावा करत माघारी परतला. त्यानंतर जोस बटलरने शेवटी २५ धावांची खेळी केली. परंतु त्याला देखील हा सामना वाचवता आला नाही.

अखेर भारतीय गोलंदाजांच्या आक्रमक गोलंदाजी समोर इंग्लिश फलंदाजांचा डाव पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे १२० धावांत कोसळला. हा सामना भारतीय संघाने १५१ धावांनी आपल्या नावावर केला.

महत्त्वाच्या बातम्या – 

तुमच्याही लक्षात आली नसेल ही बाब, लॉर्ड्स कसोटीतील रोहित शर्माचा ‘तो’ व्हिडिओ प्रचंड व्हायरल

राजस्थान रॉयल्सच्या अष्टपैलू खेळाडूची ‘द हंड्रेड’ स्पर्धेत तळपली बॅट; तब्बल १० षटकारांसह काढल्या ९२ धावा

‘विराट सर्वात उर्मट खेळाडू नाही का?’ माजी इंग्लिश सलामीवीराचा सवाल

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---