येत्या १९ सप्टेंबर पासून यूएईमध्ये इंडियन प्रीमियर लीग २०२१ स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्यातील सामने सुरू होणार आहेत.हे सामने सुरू होण्यापूर्वी सर्वच संघातील खेळाडू कसून सराव करताना दिसून येत आहे. दरम्यान राजस्थान रॉयल्स संघासाठी आनंदाची बातमी समोर येत आहे.
इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या ‘द हंड्रेड’ लीग स्पर्धेतील ३१ व्या सामन्यात, बर्मिंघम फिनिक्स आणि नॉर्दर्न सुपरचार्जर्स हे दोन्ही संघ आमने-सामने होते. या सामन्यात बर्मिंघम फिनिक्स संघाचा अष्टपैलू खेळाडू लियाम लिविंगस्टोन याने आपल्या फलंदाजीने आणि गोलंदाजीने अप्रतिम कामगिरी करत सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे.
आधी त्याने गोलंदाजी करताना ३ गडी बाद केले. त्यांनतर फलंदाजी करताना त्याने ४० चेंडूंमध्ये १० षटकार आणि ३ चौकारांच्या मदतीने नाबाद ९२ धावांची खेळी केली. ही कामगिरी पाहून राजस्थान रॉयल्सच्या चाहत्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला असेल.
या सामन्यात बर्मिंघम फिनिक्स संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. नॉर्दर्न सुपरचार्जर्स संघाला प्रथम फलंदाजी करताना ८ बाद १४३ धावा करण्यात यश आले होते. या डावात टॉम कोहलर-कॅडमोरने सर्वाधिक ७१ धावांची खेळी केली. तर सलामीवीर फलंदाज ख्रिस लिनने ३४ धावांचे महत्वपूर्ण योगदान दिले होते.
Um, ok, @liaml4893 ????
⚡ 92 runs
⚡ 40 balls
⚡ 3 fours
⚡ 10 sixes???? #TheHundred pic.twitter.com/Xdoj5SmLRe
— The Hundred (@thehundred) August 17, 2021
नॉर्दर्न सुपरचार्जर्स संघाने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना लियाम लिविंगस्टोनने ४० चेंडूंमध्ये नाबाद ९२ धावांची खेळी केली. तसेच सलामीवीर फलंदाज फिन ॲलेनने ४२ धावांचे योगदान दिले. हा सामना बर्मिंघम फिनिक्स संघाने २६ चेंडू आणि ८ गडी शिल्लक असतानाच आपल्या नावावर केला.(Rajsthan royals all rounder liam Livingstone smashes 10 sixes and fastest fifty in the hundred league)
लिविंगस्टोनने जेमिमाच्या विक्रमाची केली बरोबरी
लिविंगस्टोनची ९२ धावांची खेळी ही द हंड्रेड स्पर्धेतील सर्वात मोठी खेळी आहे. यापूर्वी भारताची जेमिमा रॉड्रिग्सने महिलांच्या द हंड्रेड लीग स्पर्धेत सूपरचार्जर्स संघाकडून खेळताना नाबाद ९२ धावांची खेळी केली होती. तसेच लिविंगस्टोनने या डावात अवघ्या २० चेंडूंमध्ये अर्धशतक झळकावत द हंड्रेड लीग स्पर्धेतील सर्वात जलद अर्धशतक झळकावले.
लियाम लिविंगस्टोन इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेत राजस्थान रॉयल्स संघाचे प्रतिनिधित्व करतो. येत्या सप्टेंबर महिन्यात इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्यातील सामने पार पडणार आहेत. पहिल्या टप्प्यात कोरोणाच्या भीतीमुळे लिविंगस्टोनने स्पर्धेतून माघार घेतली होती. आता दुसऱ्या टप्प्यात तो खेळणार की नाही हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
‘विराट सर्वात उर्मट खेळाडू नाही का?’ माजी इंग्लिश सलामीवीराचा सवाल
भारताविरुद्ध हेडिंग्ले कसोटीसाठी इंग्लंड संघाची घोषणा; मलानचे पुनरागमन, तर ‘या’ खेळांडूना वगळले






