---Advertisement---

…आणि रोहित शर्मा ठरला टीम इंडियाचा टी२०तील सर्वात अनुभवी खेळाडू

On: रविवार, नोव्हेंबर 3, 2019 7:39 PM
---Advertisement---

दिल्ली। आजपासून(3 नोव्हेंबर) भारत विरुद्ध बांगलादेश(India vs Bangladesh) संघात 3 सामन्यांची टी20 मालिका(T20I Series) सुरु झाली आहे. या मालिकेतील पहिला सामना आज अरुण जेटली स्टेडियमवर सुरु आहे. हा सामना भारतीय संघाचा प्रभारी कर्णधार रोहित शर्मासाठी(Rohit Sharma) खास ठरला आहे.

रोहितचा हा आंतरराष्ट्रीय टी20 मधील 99 वा सामना आहे. त्यामुळे रोहित आता सर्वाधिक आंतरराष्ट्रीय टी20 सामने खेळणारा भारतीय क्रिकेटपटू ठरला आहे. त्याने एमएस धोनीला(MS Dhoni) मागे टाकले आहे. धोनीने आंतरराष्ट्रीय टी20 मध्ये 98 सामने खेळले आहेत.

त्याचबरोबर जगात सर्वाधिक आंतरराष्ट्रीय टी20 सामने खेळणाऱ्या क्रिकेटपटूंमध्ये रोहितने शाहिद आफ्रिदीची बरोबरी केली आहे. आफ्रिदीनेही त्याच्या कारकिर्दीत 99 आंतरराष्ट्रीय टी20 सामने खेळले आहेत.

तसेच जगातिक क्रिकेटमध्ये सर्वाधिक आंतरराष्ट्रीय टी20 सामने शोएब मलिकने खेळले आहेत. त्याने 111 टी20 सामने खेळले आहेत. विशेष म्हणजे 100 किंवा त्यापेक्षा अधिक आंतरराष्ट्रीय टी20 सामने खेळणारा तो सध्या एकमेव क्रिकेटपटू आहे.

#आंतरराष्ट्रीय टी20मध्ये सर्वाधिक सामने खेळणारे क्रिकेटपटू – 

111 – शोएब मलिक (पाकिस्तान)

99 – शाहिद आफ्रिदी (पाकिस्तान)

99 – रोहित शर्मा (भारत)

98 – एमएस धोनी (भारत)

92 – रॉस टेलर (न्यूझीलंड)

#आंतरराष्ट्रीय टी20मध्ये सर्वाधिक सामने खेळणारे भारतीय क्रिकेटपटू – 

99 – रोहित शर्मा

98 – एमएस धोनी

78 – सुरेश रैना

72 – विराट कोहली

58 – युवराज सिंग

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---