भारतीय क्रिकेट संघाला शुक्रवारपासून (२९ जुलै) वेस्ट इंडिजविरुद्ध ५ सामन्यांची टी२० मालिका खेळायची आहे. या मालिकेतील पहिला सामना ब्रायन लारा स्टेडियम, त्रिनिदाद येथे होणार आहे. या सामन्यापूर्वी भारतीय संघाचा नियमित कर्णधार रोहित शर्मा नेट्समध्ये कसून घाम गाळताना दिसत आहे. बीसीसीआयने त्याचा सराव करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. रोहितच्या नेट्समधील फटकेबाजीला पाहता तो पहिल्या टी२० सामन्यात वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेईल, असे वाटते आहे.
भारतीय संघाचा नियमित कर्णधार रोहित (Rohit Sharma) मागील इंग्लंडविरुद्धच्या टी२० मालिकेत (T20 Series) विशेष प्रदर्शन करू शकला नव्हता. मात्र वनडे मालिकेतील पहिल्या सामन्यात त्याची बॅट चांगलीच तळपली होती आणि त्याने फॉर्ममध्ये परतण्याचे संकेत दिले होते. यानंतर वेस्ट इंडिजविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी रोहितला विश्रांती दिली गेली होती. मात्र आता टी२० मालिकेतून तो संघात पुनरागमन करेल.
या सामन्यापूर्वी रोहितने दमदार पुनरागमनासाठी नेट्समध्ये चांगला (Rohit Sharma Nest Session) वेळ घालवला आहे. बीसीसीआयने शेअर केलेल्या व्हिडिओत रोहित नेट्समध्ये चांगले फटके मारताना दिसत आहे. त्यामुळे त्रिनिदाद येथील पहिल्या सामन्यातही त्याची बॅट चांगलीच तळपेल अशी अपेक्षा आहे. त्रिनिदादला पोहोचल्यानंतर रोहितने सुरुवातीचे काही दिवस विश्रांती करण्यात घालवले. मात्र त्यानंतर आता तो सराव सत्रात चांगल्या रंगात दिसत आहे. सराव सत्रादरम्यान त्याने आपला सिग्नेचर पुल शॉटही मारला आहे.
Sound 🔛 🔊#TeamIndia captain @ImRo45 warming up in the nets ahead of the 1st #WIvIND T20I. 👌 👌 pic.twitter.com/0V5A70l2EY
— BCCI (@BCCI) July 29, 2022
आयपीएल २०२२पासून रोहितची बॅट शांत दिसली आहे. त्यामुळे आगामी टी२० विश्वचषकापूर्वी पुन्हा जुन्या लयीत परतण्यासाठी रोहित प्रयत्नशील असेल. वेस्ट इंडिजविरुद्धच्या टी२० मालिकेत तो कसे प्रदर्शन करतो?, यावर सर्वांचे लक्ष असेल.
पहिल्या टी२० सामन्यासाठी भारताची संभाव्य प्लेइंग इलेव्हन:
रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन, सूर्यकुमार यादव/श्रेयस अय्यर, रिषभ पंत(यष्टीरक्षक)/दीपक हुडा, हार्दिक पंड्या, दिनेश कार्तिक, रविंद्रा जडेजा/ अक्षर पटेल, आर अश्विन, हर्षल पटेल, भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंग
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
केएल राहुलच्या अनुपस्थितीत कोण असेल रोहितचा ओपनिंग जोडीदार? संघ व्यवस्थापनापुढे ‘हे’ २ पर्याय
वेस्ट इंडीजच्या पॉवर हिटर्सचा भारत कसा करणार सामना? द्रविडने दिल्या आहेत खास टिप्स
हार्दिकसारख्या ऑलराऊंडरचा शोध संपला! २५ वर्षीय खेळाडू ठोठावतोय टीम इंडियाचं दार