---Advertisement---

हिटमॅनचा कहर! सलग ७ व्यांदा रोहित शर्मा टी२० विश्वचषकात खेळणार, पाहा आजपर्यंतचे सर्व भारतीय संघ

On: बुधवार, सप्टेंबर 8, 2021 11:25 PM
Rohit Sharma
---Advertisement---

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) बुधवारी (८ सप्टेंबर) संयुक्त अरब अमिराती आणि ओमान येथे होणाऱ्या टी२० विश्वचषक २०२१ स्पर्धेसाठी १५ सदस्ययी भारतीय संघाची निवड केली. याबरोबर ३ राखीव खेळाडूंचीही निवड करण्यात आली. या संघात भारताचे नेतृत्व विराट कोहली करणार असून, उपकर्णधाराची जबाबदारी रोहित शर्मा निभावणार आहे.

विराट पहिल्यांदाच टी२० विश्वचषकात कर्णधार म्हणून खेळेल. तर, रोहितच्या नावावर मात्र, मोठा विक्रम झाला आहे. रोहित सलग सातव्यांदा टी२० विश्वचषकात भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करताना दिसेल. असा कारनामा करणारा तो पहिलाच भारतीय आहे.

यापूर्वी सर्वाधिक टी२० विश्वचषकात भारतीय संघाने प्रतिनिधित्व करण्याचा विक्रम रोहित, एमएस धोनी आणि युवराज सिंग यांच्या नावावर संयुक्तरित्या होता. धोनीने आजपर्यंत खेळवण्यात आलेले सर्व ६ टी२० विश्वचषकात केवळ भारताचे प्रतिनिधित्वच नाही, तर नेतृत्वही केले आहे. पण यंदा धोनी २०२१ च्या टी२० विश्वचषकात खेळाडू म्हणून नाही, तर मार्गदर्शक म्हणून दिसणार आहे. तसेच युवराजही आत्तापर्यंत ६ टी२० विश्वचषकात खेळला आहे.

त्यामुळे रोहित हा धोनी आणि युवराजला मागे टाकत सर्वाधिकवेळा टी२० विश्वचषकात भारताचे प्रतिनिधित्व करणारा खेळाडू बनला आहे. या यादीत रोहित आणि धोनी व युवराज यांच्यापाठोपाठ सुरेश रैना आहे. रैनाने ५ स्पर्धांमध्ये भारताचे नेतृत्व केले आहे.

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने २००७ साली टी२० विश्वचषकाची सुरुवात केली होती. त्यानंतर २००९, २०१०, २०१२, २०१४ आणि २०१६ या वर्षी ही स्पर्धा खेळवण्यात आली. आता २०२१ ची स्पर्धा १७ ऑक्टोबर ते १४ नोव्हेंबर दरम्यान होणार आहे. या सर्व स्पर्धांचा रोहित खेळाडू म्हणून साक्षीदार राहिला आहे.

रोहितने २००७ सालच्या स्पर्धेत ४ सामने, २००९ साली ५ सामने, २०१० साली ३ सामने, २०१२ साली ५ सामने, २०१४ साली ६ सामने आणि २०१६ साली ५ सामने असे मिळून टी२० विश्वचषकात एकूण २८ सामने खेळले आहेत. त्याने या २८ सामन्यांत ३९.५८ च्या सरासरीने ६७३ धावा केल्या असून ६ अर्धशतकांचा यात समावेश आहे. तो टी२० विश्वचषकात सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये ६ व्या क्रमाकांवर आहे.

चला तर पाहूया आजपर्यंतचे टी२० विश्वचषकासाठीचे भारतीय संघ – 
टी२० विश्वचषक २००७ चा भारतीय संघ – 
एमएस धोनी (कर्णधार), युवराज सिंग, युसूफ पठाण, वीरेंद्र सेहवाग, जोगिंदर शर्मा, हरभजन सिंग, अजित आगरकर, गौतम गंभीर, पियुष चावला, इरफान पठाण, आरपी सिंग, दिनेश कार्तिक, श्रीसंत, रोहित शर्मा, रॉबिन उथप्पा,

टी२० विश्वचषक २००९ चा भारतीय संघ – 
महेंद्रसिंग धोनी (कर्णधार), गौतम गंभीर, रवींद्र जडेजा, झहीर खान, प्रवीण कुमार, प्रज्ञान ओझा, इरफान पठाण, युसूफ पठाण, सुरेश रैना, इशांत शर्मा, रोहित शर्मा, हरभजन सिंग, आरपी सिंग, युवराज सिंग, दिनेश कार्तिक.

टी२० विश्वचषक २०१० चा भारतीय संघ – 
रोहित शर्मा, मुरली विजय, एमएस धोनी (कर्णधार), दिनेश कार्तिक, युसूफ पठाण, युवराज सिंग, सुरेश रैना, रवींद्र जडेजा, पियुष चावला, हरभजन सिंग, प्रवीण कुमार, उमेश यादव, विनय कुमार, झहीर खान, आशिष नेहरा, गौतम गंभीर.

टी२० विश्वचषक २०१२ चा भारतीय संघ – 
आर अश्विन, लक्ष्मीपती बालाजी, पियुष चावला, एमएस धोनी (कर्णधार), अशोक डिंडा, गौतम गंभीर, झहीर खान, विराट कोहली, इरफान पठाण, सुरेश रैना, वीरेंद्र सेहवाग, रोहित शर्मा, हरभजन सिंग, युवराज सिंग, मनोज तिवारी.

टी२० विश्वचषक २०१४ चा भारतीय संघ – 
एमएस धोनी (कर्णधार), वरुण ऍरोन, स्टुअर्ट बिन्नी, शिखर धवन, रवींद्र जडेजा, विराट कोहली, भुवनेश्वर कुमार, अमित मिश्रा, अजिंक्य रहाणे, आर अश्विन, सुरेश रैना, मोहम्मद शमी, मोहित शर्मा, रोहित शर्मा, युवराज सिंग

टी२० विश्वचषक २०१६ चा भारतीय संघ – 
एमएस धोनी (कर्णधार), शिखर धवन, रोहित शर्मा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, युवराज सिंग, सुरेश रैना, आर अश्विन, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, हरभजन सिंग, जसप्रीत बुमराह, पवन नेगी, आशिष नेहरा, हार्दिक पंड्या.

टी२० विश्वचषक २०२१ चा भारतीय संघ –
विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), केएल राहुल, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत (यष्टीरक्षक), इशान किशन (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, राहुल चाहर, रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह , भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी.

महत्त्वाच्या बातम्या – 

मोठी बातमी! धोनीचे टीम इंडियात कमबॅक, निभावणार ‘ही’ भूमिका

बिग ब्रेकिंग! टी२० विश्वचषकासाठी भारतीय संघाची घोषणा, अश्विनचे ४ वर्षांनी पुनरागमन, तर शिखरला वगळले

पंतप्रधान म्हणून सचिन आणि धोनी यांच्यात कोणाला निवडशील? सुरेश रैनाने दिले ‘हे’ उत्तर

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---