इंडियन प्रीमियर लीग २०२२ ची सुरुवात २६ मार्चपासून सुरु होत आहे. तत्पूर्वी सर्व संघ आपल्या फ्रॅंचायझीसोबत जोडले गेले असून आयपीएलची तयारी सुरू केली आहे. यावर्षी आयपीएलमध्ये १० संघ खेळताना दिसणार आहेत. इतर संघ मैदानात आयपीएलची तयारी करत असताना मुंबई इंडियन्स संघ नविन खेळाडूंसह एकत्र येण्यासाठी विविध प्रकारचे उपक्रम राबवताना दिसत आहे. संघांने आपल्या ट्वीटर आकाऊंटवरुन एक व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यामध्ये सर्व खेळाडू संघातील इतर खेळाडूंसोबत आनंद लूटताना दिसत आहेत.
मुंबई इंडियन्सने शेअर केलेल्या व्हिडीओत रोहित शर्मासह इतर खेळाडू सुद्धा आनंद लूटताना दिसत आहेत. मुंबई इंडियन्सचा संपुर्ण संघ आणि प्रशिक्षकांमध्ये समन्वय तेव्हा पाहायला मिळाला, जेव्हा एका फन पार्कमध्ये मज्जा-मस्ती करत खेळाडू अनेक खेळ खेळताना दिसले. त्यांचा विविध खेळ खेळतानाचा व्हिडिओ शेअर करत कॅप्शनमध्ये फ्रॅंचायझीने लिहिले की, ‘एमआय अरेनामध्ये धमाल करत आहेत.’
The opening of MI Arena was a total धमाल event! 🤩
P.S. You will just love Ro in this video. He was truly in his element. 🤣💙#OneFamily #MumbaiIndians MI TV pic.twitter.com/OB1MSXZpkU
— Mumbai Indians (@mipaltan) March 21, 2022
मुंबईचे खेळाडू एकमेकांसोबत अनेक प्रकारचे खेळ खेळताना दिसत आहेत. यामध्ये फुटसल, पिकल बाॅल, बाॅक्स क्रिकेट आणि फुट व्हाॅलिबाॅल या खेळांचा समावेश आहे. बीसीसीआयने कोरोनामुळे कडक निर्बंध लागू केले असून नियम तोडणाऱ्यावर कडक कारवाई केली जाणार आहे. हे नियम मोडले जाऊ नयेत, म्हणून मुंबई इंडियन्स संघाने १३ हजार चौरस मीटरचा बायोबबल तयार केला आहे. याचा प्रमुख उद्देश खेळाडूंनी एकत्र येणे आहे. रोहित शर्मा यामध्ये प्रचंड एनर्जीने सर्व खेळाडूंसोबत या बायोबबलचा फायदा घेताना दिसला. रोहित आणि इतर खेळाडूंसोबत संघाचे प्रशिक्षक महिला जयवर्धने आणि गोलंदाजी प्रशिक्षक शेन बाॅड हे सुद्धा यामध्ये दिसले.