भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माची खराब फाॅर्म सुरुच आहे. ज्यामध्ये आत्तापर्यंत हिटमॅन ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर काहीही आश्चर्यकारक कामगिरी दाखवू शकला नाही. मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर खेळल्या जात असलेल्या बॉक्सिंग डे कसोटी सामन्यात रोहित बॅटने चांगली कामगिरी करू शकेल, अशी आशा सर्व चाहत्यांना होती. पण चाहत्यांची पुन्हा एकदा निराशा झाली. ज्यामध्ये रोहितने पॅट कमिन्सच्या चेंडूवर केवळ 3 धावा केल्यानंतर पुल शॉट खेळण्याचा प्रयत्न करताना त्याची विकेट गमावली. या मालिकेत आतापर्यंत रोहित शर्माची फलंदाजीची सरासरी खूपच खराब आहे.
कसोटी क्रिकेटमधील मागील 14 डावांमधील रोहित शर्माचा फॉर्म पाहिला तर तो अत्यंत खालच्या स्तराचा आहे. ज्यामध्ये तो फक्त एकदाच 50 धावांचा टप्पा पार करू शकला आहे. ज्यामध्ये त्याची सर्वोच्च धावसंख्या देखील केवळ 52 धावा आहे. रोहितला शेवटच्या 14 डावांपैकी 10 वेळा दुहेरी आकडाही पार करता आला नाही. या दरम्यान रोहित एकदा शून्य धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. रोहितने गेल्या 14 डावात केवळ 155 धावा केल्या असून त्याची सरासरी 11.07 इतकी आहे, त्यामुळे आता कर्णधारासह त्याच्या संघातील स्थानावर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
A horrible form continues for Rohit Sharma! 🇮🇳👀
The Indian skipper has managed just one fifty in his last 14 Test innings, with 9 single-digit scores 😳#RohitSharma #India #AUSvIND #Tests #Sportskeeda pic.twitter.com/KnKNl9IBC0
— Sportskeeda (@Sportskeeda) December 27, 2024
बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी 2024-25 मध्ये किमान चार डावात फलंदाजी करणाऱ्या खेळाडूंमध्ये सर्वात वाईट सरासरी असलेल्या खेळाडूकडे पाहिले तर रोहित शर्माचे नाव पहिल्या स्थानावर आहे. ज्यामध्ये त्याची सरासरी नॅथन लियॉनपेक्षाही कमी आहे. या मालिकेत रोहितची आतापर्यंतची सरासरी केवळ 5.50 आहे. तर लियॉनने 6 च्या सरासरीने धावा केल्या आहेत. ऑस्ट्रेलियन संघाचा कर्णधार पॅट कमिन्सने रोहित शर्माला आपला बळी बनवले. ज्यामध्ये त्याने आतापर्यंत कसोटी क्रिकेटमध्ये रोहितला 7 वेळा पॅव्हेलियनमध्ये पाठवले आहे.
हेही वाचा-
IND VS AUS; ‘फॅब 4’ चा किंग कोण? स्टीव्ह स्मिथच्या शतकाने परिस्थिती बदलली
मनमोहन सिंग यांच्या निधनाने क्रिकेट विश्व दु:खी, हरभजन-युवराजसह सेहवागने दिली भावनिक प्रतिक्रिया
बाॅक्सिंग डे कसोटीच्या दुसऱ्या दिवशी भारतीय खेळाडूंनी दंडावर काळी पट्टी का बांधली? कारण भावूक करणारं