सध्या रणजी ट्राॅफी (Ranji Trophy) ही स्पर्धा सुरू आहे. दरम्यान मुंबईचा संघ रणजी ट्रॉफीमधील शेवटचा लीग सामना मेघालयविरूद्ध खेळणार आहे. दोन्ही संघातील हा सामना (30 जानेवारी) ते (2 फेब्रुवारी) दरम्यान खेळला जाणार आहे. मात्र, त्याआधीच महत्त्वाची माहिती समोर येत आहे. या सामन्यात रोहित शर्मा (Rohit Sharma) व्यतिरिक्त, यशस्वी जयस्वाल (Yashasvi Jaiswal), श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) आणि शिवम दुबे (Shivam Dube) हे मुंबईच्या प्लेइंग इलेव्हनचा भाग नसतील.
वास्तविक रोहित शर्मा (Rohit Sharma), यशस्वी जयस्वाल (Yashasvi Jaiswal) आणि श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) हे इंग्लंडविरूद्धच्या वनडे मालिकेचा भाग आहेत. त्याच वेळी, शिवम दुबे भारतीय टी20 संघात आहे, जो सध्या इंग्लंडविरुद्ध मालिका खेळत आहे.
सध्या भारत-इंग्लंड संघात 5 सामन्यांची टी20 मालिका खेळली जात आहे. ही मालिका (2 फेब्रुवारी) रोजी संपेल. यानंतर, दोन्ही संघ वनडे मालिकेत आमने-सामने असतील. दरम्यान दोन्ही संघात 3 सामन्यांची वनडे मालिका खेळवली जाणार आहे. ही वनडे मालिका (6 फेब्रुवारी) पासून सुरू होईल.
दोन्ही संघातील पहिला वनडे सामना नागपूरमध्ये खेळला जाईल. यानंतर, मालिकेतील दुसरा सामना (9 फेब्रुवारी) रोजी कटकमध्ये खेळला जाईल. तर तिसरा आणि शेवटचा सामना (12 फेब्रुवारी) रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जाईल. या मालिकेतील तिन्ही सामने भारतीय वेळेनुसार दुपारी 1:30 वाजता सुरू होतील.
मुंबई आपला शेवटचा लीग सामना मेघालयविरूद्ध खेळेल. मुंबई-मेघालय संघातील सामना (30 जानेवारी ते 2 फेब्रुवारी) दरम्यान मुंबईत खेळला जाईल. रोहित व्यतिरिक्त, जयस्वाल, श्रेयस आणि दुबे हे इंग्लंड वनडे मालिकेच्या पार्श्वभूमीवर मुंबईकडून खेळू शकणार नाहीत. त्यामुळे मुंबईसाठी हा एक मोठा धक्का मानला जात आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
IND vs ENG; तिसऱ्या सामन्यातही भारताचा विजय पक्का? दिग्गज गोलंदाजाचे होणार पुनरागमन
BBL FINAL; होबार्ट हरिकेन्सने रचला इतिहास, पहिल्यांदाच जेतेपदावर कोरले नाव
बुमराहने रचला इतिहास, 6 वर्षांनंतर भारतीयाने जिंकला ‘कसोटी क्रिकेटर ऑफ द इयर’ पुरस्कार