रोहित शर्माने २३ जून रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. तेव्हापासून रोहित भारतीय संघात सातत्याने महत्त्वपूर्ण योगदान देत आहे. हिट मॅन म्हणून ओळखल्या जाणार्या रोहितने २००७ मध्ये आयर्लंडविरुद्ध पदार्पण केल होत.पण त्याला त्या सामन्यात फलंदाजी करण्याची संधी मिळाली नव्हती.
रोहितने (Rohit Sharma) २०१० मध्ये बुलावायो येथे झिम्बाब्वेविरुद्धच्या वनडे सामन्यात पहिले शतक झळकावले होते. त्याच्या सुरुवातीच्या काळात रोहितला काही विशेष यश मिळू शकले नाही. परंतु कर्णधार धोनीच्या पाठिंब्यामुळे त्याला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये स्थान मिळविण्यात यश आले. मी तुम्हाला सांगतो की, रोहितने सन २०१३ मध्ये प्रथमच एकदिवसीय सामन्यात द्विशतक झळकावले होते. रोहितने ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिले द्विशतक झळकावले होते.
रोहितच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील १३ वर्षानंतर त्याच्या काही जागतिक विक्रमांविषयी जाणून घेऊया.
१. विश्वचषकात रोहित शर्माच्या नावावर ५ शतकांचा विक्रम आहे. जो एका विश्वचषकात एका फलंदाजाच्या सर्वाधिक शतकाचा विश्वविक्रम आहे.
२. रोहित वनडेमध्ये ३ दुहेरी शतके ठोकण्यात यशस्वी झाला आहे. आतापर्यंत कोणत्याही अन्य फलंदाजाने वनडेमध्ये ३ दुहेरी शतके ठोकली नाहीत. २०१४ साली रोहितने श्रीलंकेविरुद्ध २६४ धावा केल्या होत्या. जे एका वनडेमधील फलंदाजाची सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या आहे. या विक्रमी खेळीत रोहितने १७३ चेंडूंचा सामना करत ३३ चौकार आणि ९ षटकार मारले होते.
३. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये रोहितने एका वर्षात सर्वाधिक षटकार ठोकले आहेत. २०१९ मध्ये रोहितने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ७७ षटकार लगावले होते.
४. वनडे क्रिकेटमध्ये सलामीवीर म्हणून एक वर्षात सर्वाधिक शतक झळकावणारा फलंदाज रोहित आहे. सलामीवीर म्हणून रोहितने सन २०१९ मध्ये खेळल्या गेलेल्या वनडे क्रिकेटमध्ये १० शतके ठोकण्याचा चमत्कार केला होता. महत्त्वाचे म्हणजे विश्वचषक २०१९ मध्ये रोहितने ५ शतके ठोकली होती.
५. रोहित हा वेगवान ४०० आंतरराष्ट्रीय षटकार ठोकणारा फलंदाज आहे. रोहित ३५४ आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये एकूण ४०० षटकार मारण्यात यशस्वी झाला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ४०० किंवा त्याहून अधिक षटकार ठोकणारा रोहित जगातील केवळ तिसरा फलंदाज आहे. रोहितशिवाय ही कामगिरी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ख्रिस गेल आणि शाहीद आफ्रिदी यांनी केली आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ४७६ षटकार मारण्यात आफ्रिदी यशस्वी ठरला आहे. तर अनुभवी गेलने ५३४ षटकार ठोकले आहेत.
६. रोहित षटकारांच्या बाबतीत टी२० आंतरराष्ट्रीयमध्ये देखील आघाडीवर आहे. टी२० आंतरराष्ट्रीय सामन्यात रोहितने आतापर्यंत १२७ षटकार ठोकले असून या प्रकारातील कोणत्याही फलंदाजाने सर्वाधिक षटकार ठोकण्याचा विक्रम त्याच्या नावी आहे. तर न्यूझीलंडच्या मार्टिन गुप्टिलने ११९ षटकार लगावले आहेत.
ट्रेंडिंग घडामोडी-
-सचिन तेंडूलकर विरुद्ध राहुल द्रविड: शेवटी याचं उत्तर मिळालंच, पहा कोण आहे मोठा क्रिकेटर
-क्रिकेट विश्वविजेत्या भारताच्या ट्राॅफी नक्की आहेत तरी कुठं?
-१९८३च्या कपिल देव आणि २०१७च्या हरमनप्रीत कौर यांच्या खेळीतील साम्य !