यावर्षी ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यात भारतात वनडे विश्वचषक खेळला जाणार आहे. भारतीय क्रिकेट नियमक मंडळ आणि संघ व्यवस्थापन आगामी विश्वचषकासाठी पूर्ण तयारीला लागले आहे. पण कर्णधार रोहित शर्मा आणि संघातील इतर खेळाडूंची चिंता वाढल्याचे दिसते. याचे कारण ठरत आहे दुखापतग्रस्त खेळाडू. रोहितने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत श्रेयस अय्यर आणि केएल राहुल यांच्या दुखापतीविषयी चिंता व्यक्त केली.
आयसीसी वनडे विश्वचषक 2023 (ODI World Cup 2023) अवघ्या काही आठवड्यांवर आला आहे. 5 ऑक्टोबर रोजी विश्वचषकाचा पहिला सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जाणार आहे. केएल राहुल आणि श्रेयस अय्यर यांच्यासह जसप्रीत बुमराह (Rohit Sharma) हादेखील मागच्या काही महिन्यांपासून बेंगलोरच्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत फिटनेसवर काम करत आहे. बुमराहने फिटनेस मिळवल्याचे सांगितले जात आहे. पण अय्यर आणि राहुलच्या फिटनेसबाबत अद्याप कुठली ठोस माहिती मिळाली नाहीये. अशात वनडे विश्वचषकासाठी त्यांचे संघात स्थान धोक्यात आले आहे. कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) यालाही ही बाब सतावत असल्याचे दिसते.
नुकत्याच मुंबईत पार पडलेल्या एका कार्यक्रमात रोहित शर्मा बोलत होता. यावेळी अय्यर आणि राहुलच्या फिटनेसबाबत रोहित म्हणाला, “श्रेयस अय्यर आणि केएल राहुल चार महिन्यांपासून अजिबात क्रिकेट खेळले नाहीत. त्यांना दुखापत झाली होती आणि त्यानंतर शस्त्रक्रिया देखील करावी लागली. मला देखील एकदा शस्त्रक्रिया करावी लागली होती. त्यामुळे हा अनुभव कसा असतो, हे मला माहीत आहे. खेळाडूंना खूप अडचणींचा सामना करावा लागतो. अशात खेळाडू किती सुधारणा करतात आणि गोष्टी कशा पद्धतीने पुढे जातात, हे येत्या काळात पाहू.”
दरम्यान, श्रेयस अय्यर याला मायदेसात ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी मालिका खेळताना दुखापत झाली आणि त्याने अर्ध्यातून माघार घ्यावी लागली. दुखापतीमुळे त्याला यावर्षी आयपीएल आणि जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात माघार घ्यावी लागली. दरम्यानच्या काळात अय्यरवर लंडनमध्ये शस्त्रक्रिया देखील पार पडली. दुसरीकडे केएल राहुल याला देखील दुखापतीमुळे आयपीएल 2023 हंगाम अर्ध्यात सोडावा लागला होता. राहुलवर इंग्लंडमध्ये मोठी शस्त्रक्रिया पार पडली असून अजूनही तो मैदानात परतला नाहीये. भारतीय संघाला मात्र या दोन्ही प्रमुख खेळाडूंच्या दुखापतीचा मोठा फटका बसला आहे. वनडे विश्वचषकापूर्वी भारतीय संघ मायदेशात ऑस्ट्रेलियाविरुद्ध तीन वनडे सामन्यांची मालिका खेळणार आहे. या मालिकेत अय्यर आणि राहुल पुनरागमन करण्याची शक्यता होती. पण अद्याप याविषयी कुठलीच ठोस माहिती किंवा चर्चा होताना दिसत नाहीत. (Rohit Sharma’s anxiety increased by these two Players! He was going to play an important role in the ODI World Cup)
महत्वाच्या बातम्या –
‘या’ भारतीयाने स्विंगच्या जोरावर 15 वर्ष दिला त्रास, ऍरॉन फिंचने स्वतः केले मान्य
दुखापतग्रस्त विलियम्सनची मोठी प्रतिक्रिया! जाणून घ्या विश्वचषकात खेळणार की नाही?