द ओव्हल येथे सुरू असलेल्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी भारतीय संघाच्या खेळाडूंकडून विकेट घेतल्यानंतर प्रचंड जल्लोष झाला. त्यातही डेविड मलानची मोठी विकेट मिळाल्यानंतर भारतीय खेळाडूंचा आनंदात गगनात मावेनासा झाला होता. कर्णधार विराट कोहली, सलामीवीर रोहित शर्मा, केएल राहुल आणि यष्टीरक्षक रिषभ पंत या जल्लोषात सहभागी झाले होते. भारतीय संघातील खेळाडूंची एकमेकांप्रती असलेली ही भावना चाहत्यांनाही फार आवडत आहे.
भारतासाठी डावाच्या २५ व्या षटकात गोलंदाजी करण्यासाठी आलेल्या उमेश यादवचा एक चेंडू मलानच्या बॅटची बाहेरील कड घेऊन पहिल्या आणि दुसऱ्या स्लिपच्या दरम्यान गेला. त्यावेळी दुसऱ्या स्लिपवर उभा असलेल्या रोहित शर्माने सूर मारून जबरदस्त झेल घेतला. यावेळी त्याच्याबाजूला पहिल्या स्लिपवर विराट कोहली क्षेत्ररक्षण करत होता.
या झेलनंतर लगेच विराट कोहली, रिषभ पंत आणि केएल राहुल रोहित शर्माच्या दिशेने धावत आले आणि त्यांनी तिघांनीही हिटमॅनला मिठी मारली. त्याचबरोबर हा झेल पकडल्यानंतर रोहित शर्माच्या चेहऱ्यावरील हास्य पाहण्यासारखे होते. रोहितकडे हा झेल घेण्यासाठी खूप कमी वेळ होता. पण त्याने कोणतीही चूक केली नाही आणि अचूक झेल टिपला होता.
https://twitter.com/Prince19M76/status/1433769548298158082?s=20
सामन्याबद्दल बोलायचे झाले, तर भारतीय संघाच्या १९१ धावांच्या प्रत्युत्तरात यजमान इंग्लंडचा पहिला डाव २९० धावांवर संपुष्टात आला आहे. यासह इंग्लंडने भारतीय संघावर दुसऱ्या डावात ९९ धावांची भक्कम आघाडीही घेतली आहे. भारताकडून उमेश यादवने तीन विकेट्स घेतल्या. तर बुमराह आणि जडेजाने प्रत्येकी २ बळी घेतले. याशिवाय सिराज आणि शार्दुल ठाकूरच्या खात्यात १-१ विकेट्स आल्या.
इंग्लडकडून पहिल्या डावात ओली पोपने ८१ धावांची खेळी केली आणि ख्रिस ओक्सने ५० धावांची अर्धशकीय खेळी करून इंग्लडला आघाडी मिळवून दिली. भारताने दुसऱ्या डावात एकही विकेट न गमावता ४३ धावा केल्या आहेत आणि आता ते इंग्लिश संघाच्या पहिल्या डावाच्या धावसंख्येपासून ५६ धावांनी मागे आहेत. रोहित २० तर केएल राहुल २४ धावांवर नाबाद आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
ऑली पोपमुळे धुळीस मिळू लागल्या होत्या भारताच्या ‘होप’, इतक्यात शार्दुलने केली दांडी गुल
मोठी संधी गमावली, तिसऱ्याच षटकात बर्न्समुळे रोहितला जीवनदान; आता सलामीवीर उडवणार धुरळा…!
भारताकडून घोडचूक, मोईन बाद होऊनही केली नाही अपील; इंग्लंडला फुकटात मिळाल्या ७२ धावा!