आयपीएल स्पर्धेच्या इतिहासातील सर्वात यशस्वी संघ म्हणून मुंबई इंडियन्स संघाची ओळख आहे. या संघाने ५ वेळेस जेतेपद आपल्या नावावर केले आहे. परंतु आयपीएल २०२१ स्पर्धेत या संघाला प्लेऑफमध्ये प्रवेश करण्यात अपयश आले आहे, ज्यामुळे मुंबई इंडियन्स संघाचे चाहते निराश झाले आहेत. तसेच स्पर्धेतून बाहेर पडल्यानंतर कर्णधार रोहित शर्मा याने भावूक करणारे ट्विट केले आहे.
शुक्रवारी (८ ऑक्टोबर) मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद या दोन्ही संघांमध्ये रोमांचक सामना पार पडला होता. प्लेऑफमध्ये प्रवेश करण्यासाठी मुंबई इंडियन्स संघाला या सामन्यात १७१ धावांनी विजय मिळवायचा होता. मात्र मुंबई इंडियन्स संघाला अवघ्या ४२ धावांनी विजय मिळवता आला. या विजयानंतर समान गुण होऊनही कोलकाता नाईट रायडर्स संघापेक्षा कमी रन रेट असल्यामुळे मुंबई इंडियन्स संघाला प्लेऑफमध्ये प्रवेश करता आला नाही.
स्पर्धेतून बाहेर झाल्यानंतर, रोहित शर्मा भावूक झाल्याचे पाहायला मिळाले. त्याने शनिवारी (९ ऑक्टोबर) एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यावर कॅप्शन म्हणून लिहिले आहे की, “चढ-उतारांनी भरलेला हा हंगाम, हे १४ सामने आम्ही केलेल्या २-३ हंगामातील चांगल्या कामगिरीचे वैभव कमी करू शकत नाही. निळी आणि सुवर्ण रंगांनी माखलेली जर्सी घातलेला प्रत्येक खेळाडू अभिमानाने खेळला आणि त्यांनी आपले सर्वोत्तम दिले. हीच गोष्ट आम्हाला एक संघ बनवते.”
त्याच्या या भावनिक संदेशाने मुंबई संघातील खेळाडूंना तर धीर मिळालाच असावा पण या संदेशाने अगदी चाहत्यांची मनेही पिघळली असावीत. अनेकांनी या व्हिडिओखाली भावुक प्रतिक्रिया दिल्या आहेत.
A season full of ups, downs & learnings. But these 14 matches won’t take away the glory this incredible group achieved over the last 2-3 seasons. Every player who don the blue & gold played with pride & gave his best. And that’s what makes us the team we are! ONE FAMILY @mipaltan pic.twitter.com/bcylQ2dSMY
— Rohit Sharma (@ImRo45) October 9, 2021
मुंबई इंडियन्स संघाचा जोरदार विजय
सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या निर्णायक सामन्यात, मुंबई इंडियन्स संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करताना ईशान किशनने सर्वाधिक ८४ धावांची खेळी केली. या खेळी दरम्यान त्याने ११ चौकार आणि ४ षटकार मारले होते. तर सूर्यकुमार यादवने १३ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने ८२ धावांची खेळी केली होती. या खेळीच्या जोरावर मुंबई इंडियन्स संघाला ९ बाद २३५ धावा करण्यात यश आले होते.
या धावांचा पाठलाग करताना सनरायझर्स हैदराबाद संघाकडून मनीष पांडेने ७ चौकार आणि २ षटकारांचा साहाय्याने ६९ धावांची खेळी केली. तर जेसन रॉयने ३४ धावांचे योगदान दिले होते. २० षटक अखेर सनरायझर्स हैदराबाद संघाला ८ बाद १९३ धावा करण्यात यश आले होते. या सामन्यात मुंबई इंडियन्स संघाने ४२ धावांनी विजय मिळवला होता.
महत्त्वाच्या बातम्या-
सनरायझर्सचे वॉर्नरसोबत वाळीत टाकल्याप्रमाणे वर्तन!! संघातून तर वगळलंच, आता फेअरवेल व्हिडिओतूनही गायब
सलग ३ पराभवांमुळे चिंतेत असलेल्या सीएसकेला तगडा झटका, दिल्लीविरुद्ध ‘या’ धुरंधराचे खेळणे अनिश्चित
टी२० विश्वचषकासाठी अफगाणिस्तान संघाला लाभणार ‘या’ दिग्गजाचे मार्गदर्शन, इंग्लंडला बनवलेय विश्वविजेता