भारतीय क्रिकेट संघ सध्या मोठ्या बदलातून जात आहे. मर्यादित षटकांच्या क्रिकेटनंतर भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली याने कसोटी संघाचे कर्णधारपदही सोडले आहे. त्याच्या या निर्णयानंतर आता कसोटी संघाचा उपकर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) याची नेतृत्त्वपदी वर्णी लागण्याची दाट शक्यता आहे. एकीकडे कर्णधारपदामुळे रोहितची चर्चा सुरू असताना दुसरीकडे त्याचे वडिल (Rohit Sharma’s Father) गुरूनाथ शर्मा (Gurunath Sharma) यांचीदेखील सध्या भरपूर चर्चा होते आहे.
क्रिकेटजगतातील विस्फोटक फलंदाजांपैकी एक असलेल्या रोहितचे वडिल हातात बॅट घेऊन मैदानावर उतरल्याने ते चर्चेत आले आहेत. त्यांचा फलंदाजी करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.
व्हिडिओ पाहा- क्रिकेटर्सलाही मागे सोडत ‘हे’ अंपायर कमावतात चिक्कार पैसा
‘स्पोर्ट्स तक’ या टीव्ही चॅनलवर गुरूनाथ यांचा फलंदाजी करतानाचा प्रसंग दाखवण्यात आला होता. याच प्रसंगाचा व्हिडिओ एका ट्वीटर वापरकर्तीने आपल्या अकाउंटवर पोस्ट केला आहे. या व्हिडिओत दिसते की, गुरूनाथ हातात बॅट घेऊन रोहितप्रमाणे पुल शॉट मारत (Rohit’s Father Batting) आहेत. त्यांच्या या शॉटचे कौतुक करताना मागे उभा राहिलेला त्यांचा मुलगा आणि रोहितचा भाऊ विशाल शर्मा, जोरजोराने टाळ्या वाजवत आहे.
रोहितप्रमाणेच त्याच्या वडिलांनाही फलंदाजी करताना पाहून क्रिकेटरसिक भलतेच खुश झाले आहेत. त्यांच्या फलंदाजीच्या व्हिडिओला हजारोंमध्ये व्ह्यूज आणि लाईक्स आले आहेत. सोशल मीडियावर हा व्हिडिओ वेगाने व्हायरल होतो आहे. विशेष म्हणजे, स्वत: रोहितनेही आपल्या वडिलांच्या फलंदाजी करत असलेल्या व्हिडिओला लाईक केले आहे.
https://twitter.com/imDBasit/status/1482944388825161729?s=20
https://twitter.com/imDBasit/status/1483313070860824579?s=20
रोहित श्रीलंकेविरुद्ध करू शकतो पुनरागमन
दरम्यान रोहित सध्या दुखापतीमुळे विश्रांतीवर आहे. डिसेंबर महिन्याअंती भारताचा संघ दक्षिण आफ्रिका गेला असून २३ जानेवारी रोजी तिसऱ्या वनडे सामन्याने या दौऱ्याची सांगता होईल. या दौऱ्यातील कसोटी मालिकेत रोहित उपकर्णधार म्हणून तर वनडे मालिकेत कर्णधार म्हणून मैदानात उतरणार होता. परंतु तत्पूर्वी झालेल्या दुखापतीमुळे तो या संपूर्ण दौऱ्यातून बाहेर पडला आहे.
बेंगलोर स्थित राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत पुनर्वसन कार्यक्रमातून गेल्यानंतर आता तो फिट असल्याचे दिसत आहे. त्यामुळे फेब्रुवारी-मार्चमध्ये मायदेशात श्रीलंकेविरुद्ध होणाऱ्या कसोटी आणि टी२० मालिकेतून तो संघात पुनरागमन करेल.
महत्त्वाच्या बातम्या-
“विराट आणि शास्त्री यांनी धोनीला कसोटी कर्णधारपद सोडण्यासाठी भाग पाडले”
Photo: धोती-कुर्त्यात खेळाडू अन् संस्कृत भाषेत समालोचन, असा क्रिकेट सामना पाहिलाय का?
कसोटी मालिकेत दुखापतग्रस्त झालेला सिराज वनडे मालिकेत खेळणार का? उपकर्णधाराचा मोठा खुलासा
हेही पाहा-