---Advertisement---

जिथून सुरुवात झाली तिथेच हिटमॅनचा सन्मान, रोहित शर्माच्या स्टॅन्डचं वानखेडेवर अनावरण..!

On: शुक्रवार, मे 16, 2025 6:40 PM
---Advertisement---

मुंबई क्रिकेटचा राजा रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नावाचं स्टँन्ड इथून पुढे मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर (wankhede stadium) पाहायला मिळणार आहे. रोहित शर्माच्या नावाच्या स्टँन्डचं वानखेडेच्या मैदानावर अनावरण करण्यात आलं आहे . वानखेडे स्टेडियममध्ये आज म्हणजेच (16 मे) रोजी मुंबई क्रिकेट असोसिएशनने 4 नव्या स्टँन्डच्या अनावरणाचा भव्यदिव्य कार्यक्रम मोठ्या दिग्गजांच्या सन्मानार्थ आयोजित केला आहे.

रोहित या कार्यक्रमासाठी आपल्या संपूर्ण कुटुंबासह पोहोचला होता. रोहित शर्माचे आई-बाबा त्याची पत्नी रितिका , भाऊ आणि त्याची पत्नी सर्व कुटुंब या सुंदर ऐतिहासक क्षणासाठी स्टेडियममध्ये उपस्थित होते.

रोहित शर्माचे आई-वडिल आणि त्याची पत्नी या त्याच्या नावाच्या स्टँन्डचं अनावरण करण्यासाठी स्टेजवर उपस्थित होते. रोहित शर्माची पत्नी रितिका शाजदेह यादरम्यान भावुक झाली होती.

रोहित शर्माने नुकतीच कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. रोहित शर्माने भारताच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये भारताचे नेतृत्त्व केले आहे. रोहित शर्माच्या स्टँन्डजवळ त्याच्या कसोटी क्रिकेटमधील जर्सीचा फोटो होता. मुंबई इंडियन्सचा संपूर्ण संघही या कार्यक्रमासाठी स्टेडियममध्ये उपस्थित होता. रोहित शर्मा वानखेडेच्या या मैदानावरच क्रिकेट खेळत मोठा झाला. या स्टँन्डच्या अनावरणावेळी रोहित शर्माने भावना शब्दात व्यक्त करता येणार नाहीत, असे देखील याआधी म्हटले होते.

सर्वात आधी शरद पवारांचं नाव दिलेल्या स्टँन्डचं अनावरण करण्यात आलं. अजित वाडेकरांच्या कुटुंबाने त्यांच्या नावाच्या स्टँन्डचे अनावरण केले. अजित वाडेकर जे भारताच्या वनडे संघाचे पहिले कर्णधार होते. ज्यांनी भारताबाहेर टीम इंडियाला पहिला मालिका विजय मिळवून दिला होता. यानंतर मुंबई क्रिकेट असोसिएशनचे माजी अध्यक्ष अमोल काळे यांच्या स्मृती प्रीत्यर्थ ऑफिस लाँजला त्यांचे नाव देण्यात आले आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---