बिली बाउडेन (Billy Bowden), हे नाव घेतले की क्रिकेटरसिकांच्या डोक्यात विचित्र खाणाखुणा करत निर्णय देणाऱ्या क्रिकेट पंचाची प्रतिमा उभी राहाते. न्यूझीलंडच्या हा क्रिकेट पंच नेहमी क्रिकेटच्या मैदानावर पंचगिरी करताना वेगवेगळ्या पद्धतीने निर्णय देत असे. त्याचे हाताची बोटे वाकडी करत फलंदाजाला बाद देण्याची पद्धत तर क्रिकेटप्रेमींमध्ये प्रसिद्ध आहे. परंतु भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा (Captin Rohit Sharma) याने त्याच्या डीआरएस मागण्याच्या हटके स्टाईलने (Rohit Sharma Review Style) पंच बिली बाउडेन यांनाही मागे टाकले आहे.
रविवारी (२० फेब्रुवारी) भारत विरुद्ध वेस्ट इंडिज (IND vs WI) यांच्यात कोलकाता येथे झालेल्या तिसऱ्या आणि शेवटच्या टी२० (Third T20I) सामन्यादरम्यान हा प्रकार घडला आहे. भारताने १७ धावांनी हा सामना जिंकला आहे. कर्णधार रोहितने या सामन्यादरम्यान हटके अंदाजात डीआरएससाठी अपील करत सामना दर्शकांचे लक्ष वेधले आहे.
तर झाले असे की, या सामन्यात वेस्ट इंडिजने नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले होते. भारतीय संघाने या आमंत्रणाचा स्विकार करत निर्धारित २० षटकात ५ विकेट्सच्या मोबदल्यात १८४ धावा केल्या होत्या. भारताच्या १८५ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना पहिल्याच षटकात हा डीआरसचा ड्रामा पाहायला मिळाला.
An immediate review from Rohit Sharma shows a spike on batsman's bat, fantastic review. pic.twitter.com/c8NH348f84
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) February 20, 2022
वेगवान गोलंदाज दीपक चाहर हे षटक टाकण्यासाठी आला होता. त्याच्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर पंचांनी वेस्ट इंडिजचा फलंदाज कायले मेयर्सला पायचित दिले होते. यावर या सलामीवीराने त्वरित डीआरएस घेत स्वतचा बचाव केला होता. डीआरएसमध्ये चेंडू स्टंप्सच्या वरून गेल्याचे दिसल्याने पंचांना त्यांचा निर्णय मागे घ्यावा लागला होता. परंतु मेयर्सला या जीवनदानाचा जास्त फायदा झाला नाही.
— cricket 456789 (@456789Cricket) February 20, 2022
त्याच षटकातील पाचवा चेंडू मेयर्सच्या बॅटच्या कडेला लागत यष्टीमागे उभा असलेल्या इशान किशनच्या हाती गेला. इशानने कसलीही चूक न करता तो चेंडू पकडला होता. परंतु यावेळी मैदानी पंचांनी त्याला बाद दिले नव्हते. अशात लगेचच कर्णधार रोहितने डीआरएससाठी अपील केली आणि त्याचा निर्णय योग्यही निघाला. मेयर्स ६ धावा करत झेलबाद होऊन पव्हेलियनला परतला.
परंतु खरी मजा यात नव्हती, तर रोहितच्या डीआरएस मागण्याच्या पद्धतीत होती. पंचांनी मेयर्सला झेलबाद देण्यास नकार दिल्यानंतर कर्णधार रोहित वेगाने धावत आला. त्याने डावा हात हवेतून फिरवत मोठ्या दिमाखात आपल्या उजव्या हातावर ठेवत डीआरएससाठी मागणी केली. त्याच्या या डीआरएसच्या मागणी करण्याच्या पद्धतीने सामना दर्शकांचे मात्र लक्ष वेधले आहे. अनेकांना रोहितची ही डीआरएस घेण्याची पद्धत आवडली आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
जमशेदपूरने विजयी हॅटट्रिक साजरी करताना चेन्नईयनच्या आशा मावळून टाकल्या
VIDEO: सूर्याने मारलेला मनमोहक ‘गुडघा टेक’ षटकार पाहिला का?
‘रोहित अन् संघा’चा विजयी धमाका! वनडेनंतर टी२०तही तगड्या वेस्ट इंडिजचा ३-० ने व्हाईटवॉश






