मुंबई इंडियन्सचा माजी कर्णधार रोहित शर्मा आयपीएल 2025 मध्ये संघाचा भाग असेल की नाही याबाबत चर्चा सुरू झाली आहे. गेल्या मोसमात मुंबईने रोहितला कर्णधारपदावरून हटवून हार्दिक पांड्याला संघाचा नवा कर्णधार म्हणून नियुक्त केले होते. मात्र फ्रँचायझीचा हा निर्णय योग्य ठरला नाही आणि संघाची कामगिरी अत्यंत निराशाजनक झाली. मुंबईचा संघ शेवटच्या स्थानावर राहिला.
दुसरीकडे रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारताने टी20 विश्वचषकाचे विजेतेपद पटकावले आहे. त्यामुळे रोहित लिलावात आल्यास अनेक फ्रँचायझी त्याच्यावर बोली लावू शकतात. आगामी हंगामापूर्वी रोहित मुंबईबाहेर पडू शकतो. असे आकाश चोप्राचे मत आहे.
त्याच्या यूट्यूब चॅनलवर आकाश चोप्रा म्हणाला, “तो राहणार की जाणार? हा एक मोठा प्रश्न आहे. वैयक्तिकरित्या मला वाटतं की तो राहणार नाही. ज्याला कायम ठेवलं जातं, तो निदान तीन वर्षं सोबत राहील या विचारानेच ठेवलं जाते. मला वाटते की रोहित शर्मा स्वतःहून निघून जाईल किंवा तो मुंबईला सोडू शकेल.
तो म्हणाला, “काहीही होऊ शकते पण मला वाटत नाही की रोहितला रिटेन केले जाईल.” माझ्याकडे कोणतीही माहिती नाही. पण त्याची सुटका होईल असे वाटते. तो ट्रेड विंडोमध्ये दुसऱ्या कोणाकडे जाऊ शकतो. तो लिलावात न जाण्याची शक्यता आहे. परंतु तसे न झाल्यास तो लिलावात दिसू शकतो. मला वाटतं त्याचा मुंबई इंडियन्ससोबतचा प्रवास संपला आहे.”
रोहित शर्मा आयपीएल इतिहासाच्या सर्वात यशस्वी कर्णधारांपैकी एक आहे. त्याने मुंबई इंडियन्ससाठी पाच जेतेपद पटकावले आहेत. त्याच्याव्यतीरिक्त अशी कामगिरी करणारा एकच क्रिकेटपटू आहे. तो म्हणजे महान कर्णधार एमएस धोनी. या दोघांची गणना आयपीएलच्या इतिहासात महान कर्णधारांमध्ये केली जाते. आता अश्या परिस्थितीत मेगा लिलावापूर्वी मुंबई इंडियन्स व्यवस्थापन रोहित शर्माबाबत कोणता निर्णय घेणार हे पाहणे महत्तवाचे ठरणार आहे.
हेही वाचा-
कांगारुंचा वरचढ! यजमान इंग्लंडचा घरच्या मैदानावर दारुण पराभव
AFG vs NZ; कसोटीच्या चौथ्या दिवशीही पावसाची सावली, टॉसशिवाय सामना रद्द होणार?
‘रोहित-बुमराह’ नाही तर हा खरा क्रिकेटचा ‘शहेनशाह’, गाैतम गंभीरचे लक्षवेधी वक्तव्य