भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसऱ्या वनडे सामन्यात रोहित शर्मा चर्चेत राहिला. आधी नाणेफेक जिंकल्यानंतर आणि नंतर फलंदाजी करताना रोहितसोबत खास प्रसंग घडल्याचे पाहायला मिळाले. रोहितच्या नेतृत्वातील खेळणाऱ्या भारतीय संघाने या सामन्यात प्रथम फलंदाजी केली आणि पाहुण्या न्यूझीलंडला स्वस्तात गुंडाळले. भारताच्या फलंदाजीवेळी रोहित शर्मा डावाची सुरुवात करण्यासाठी आला. यावेळी त्याचा एक चिमुरडा चाहता ग्राउंड स्टाफची नजर चुकवत कसाबसा रोहितपर्यंत खेळपट्टीवर पोहोचला.
रोहित शर्मा (Rohit Sharma) या सामन्यात चांगल्या फॉर्ममध्ये फलंदाजी करताना दिसला. त्याने 47 चेंडूत स्वतःचे अर्धशतक देखील पूर्ण केले. रोहित खेळपट्टीवर सेट होत असतानाच 10 व्या षटकात त्याचा एक चाहता थेट खेळपट्टीवर धावत आला (Rohit Sharma Fan moment). या चिमुरड्या चाहत्याने आल्याबरोबर रोहितला मिठी मारली. ग्राउंड स्टाफची नजर चुकवून मैदानात आलेल्या या चाहत्याला बाहेर नेण्यासाठी कर्मचारी धावत आले. यावेळी रोहितने या कर्मचाऱ्यांना, “मुलाला लहान आहे, त्याला काही करू नका.” असेही सांगितले.
Rohit Sharma asking the security guard not to do anything against the fan.
Nice gesture from Captain. pic.twitter.com/pLS9NE9D40
— Johns. (@CricCrazyJohns) January 21, 2023
Craze for Rohit Sharma in Raipur. pic.twitter.com/VNOVLyZmoc
— Johns. (@CricCrazyJohns) January 21, 2023
दरम्यान, ही पहिली वेळ नाहीये, जेव्हा भारतीय खेळाडूंचे चाहते अशाप्रकारे लाईव्ह सामन्यात आवडत्या खेळाडूला भेटण्यासाठी थेट मैदानात आले आहेत. यापूर्वीही अनेकदा असे प्रकार भारतीय संघाच्या सामन्यावेळी पाहिले गेले आहेत. दरम्यान, या चाहत्याला बाहेर नेत असताना रोहितने ग्राउंड स्टाफच्या कर्मचाऱ्यांना जे सांगितले, त्यासाठी सोशल मीडियावर रोहितचे कौतुक देखील होत आहे.
तत्पूर्वी नाणेफेक जिंकल्यानंतर ऱोहितसोबत एक हास्यास्पद प्रकार घडला. पहिल्या वनडे सामन्याप्रामाणे रोहिते या दुसऱ्या वनडे सामन्यात देखील नाणेफेक जिंकली. पण नाणेफेक जिंकल्यानंतर त्याने सहकाऱ्यांसोबत काय निर्णय ठरवला होता, हेच विरसला. नाणेफेक जिंकल्यानंतर रोहितने त्याचा निर्णय लगेच सांगणे अपेक्षित होतो, मात्र त्याआधी त्याला काही वेळ विचार करावा लागला आणि नंतर थ्याने गोलंदाजीचा निर्णय घेतला. रोहितसोबत घडलेला हा मजेशीर प्रसंग पाहिल्यानंतर चाहत्यांकडून वेगवेगे मिम्स शेअर केले जात आहेत.
Rohit Sharma 😅#INDvNZ pic.twitter.com/ndtRppwwFX
— RVCJ Media (@RVCJ_FB) January 21, 2023
उभय संघांतील या सामन्याचा एकंदरीत विचार केला, तर प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंज संघ अवघ्या 108 धावांवर सर्वबाद झाला. प्रत्युत्तरात रोहित शर्मा आणि शुबमन गिल यांनी पहिल्या विकेटसाठी 86 चेंडूत 72 धावा केल्या. (Rohit Sharma’s little fan reached the pitch directly during the live match)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
ऍलेक्स हेल्सचे इंटरनॅशनल लीग टी20तील पहिले शतक, पाहा इतर स्पर्धेतील शतकवीरांची यादी; गेलचा दोनदा समावेश
आख्ख्या संघाला जे 11 वर्षात जमलं नाही, ते स्मिथने 5 दिवसात करून दाखवलं; आकडेवारी उडवेल तुमचीही झोप