---Advertisement---

Rohit Sharma Retirement: कशी राहिली रोहित शर्माची कसोटी कारकिर्द?

rohit sharma
---Advertisement---

भारताचा दिग्गज क्रिकेटर रोहित शर्मा बुधवारी (7 मे) रोजी आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेटमधून निवृत्त जाहीर केली आहे. (Rohit Sharma Retire From Test Cricket) रोहितने त्याच्या इंस्टा स्टोरिद्वारे कसोटी क्रिकेटच्या निवृत्तीची माहिती दिली. रोहित शर्माने त्याचा शेवटचा कसोटी सामना 30 डिसेंबर 2024 रोजी खेळला होता. चला तर मग आपण रोहितच्या कसोटी क्रिकेटमधील आकडेवारीवर नजर टाकूया.

रोहित शर्माने 8 नोव्हेंबर 2013 रोजी आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. त्याने कसोटीतील आपला पहिला सामना वेस्ट इंडिजविरूद्ध कोलकाताच्या ईडन गार्डन्स मैदानावर खेळला. तेव्हापासून रोहितने कसोटी क्रिकेटमध्ये आपला ठसा उमटवला आणि अनेकवेळा चमकदार कामगिरी करून चाहत्यांची मनं जिंकली.

रोहितच्या कसोटी क्रिकेटमधील आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीबद्दल बोलायचे झाल्यास, त्याने भारतासाठी 67 कसोटी सामने खेळले आहेत. त्यामध्ये त्याने 116 डावात फलंदाजी करताना 40.57च्या सरासरीने 4,301 धावा केल्या आहेत. दरम्यान त्याची सर्वोच्च धावसंख्या 212 राहिली. कसोटीमध्ये रोहितने 18 अर्धशतकांसह 12 शतके झळकावली आहेत.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---