ऑकलँड। न्यूझीलंड विरुद्ध भारत संघात आज(24 जानेवारी) पहिला टी20 सामना इडन पार्क येथे सुरु आहे. या सामन्यात भारताने 6 विकेट्सने विजय मिळवला आहे. या सामन्यात भारताचा उपकर्णधार रोहित शर्माला फलंदाजीत काही खास करता आले नसले तरी त्याने क्षेत्ररक्षण करताना बाउंड्री लाईनवर एक अफलातून झेल घेतला.
झाले असे की न्यूझीलंड संघ प्रथम फलंदाजी करत असताना 8 व्या षटकात शिवम दुबेने टाकलेल्या पाचव्या चेंडूवर मार्टिन गप्टिलने मोठा फटका मारला. त्यामुळे चेंडू डीप स्क्वेअर लेगच्या दिशेला उंच उडाला. यावेळी रोहितने चेंडूवर नजर ठेवताता बाउंड्री लाईन जवळ झेल घेतला. पण त्याचा तोल जात असल्याने बाउंड्री लाईनला पाय लागेल या भीतीने रोहितने हा चेंडू वर फेकला आणि नंतर तोल सांभाळत तो चेंडू पून्हा झेलला.
त्यामुळे गप्टिलला त्याची विकेट गमवावी लागली. गप्टिलने या सामन्यात 19 चेंडूत 30 धावांची खेळी केली होती. तसेच त्याने कॉलिन मुन्रोबरोबर 80 धावांची सलामी भागीदारीही रचली.
Super catch Rohit👏👏👏 @ImRo45 pic.twitter.com/J4KeUr1dNx
— 🅰🅽🆅🅴🆂🅷(🅽.🆃.🆁) (@anvesh_tony) January 24, 2020
#RohitSharma Outstanding Catch In Today's Match!
Watch & Retweet And Don't Forget To Follow Our Page! #NZvsIND #NZAvINDA pic.twitter.com/x4Mpdgqdqm— rajnishsingh (@rajnish_am) January 24, 2020
गप्टिल बाद झाल्यानंतर न्यूझीलंडकडून मुन्रो(59), केन विलियम्सन(51) आणि रॉस टेलर(54) यांनी अर्धशतके करत न्यूझीलंडला 203 धावसंख्येवर पोहचवले. त्यानंतर भारताने 204 धावांचे आव्हान 19 षटकात पूर्ण करत हा सामना जिंकला. भारताकडून केएल राहुल(56) आणि श्रेयस अय्यरने (58*) अर्धशतकी खेळी केली.
पहिल्या टी२० सामन्यात टीम इंडियाविरुद्ध न्यूझीलंडच्या ३ फलंदाजांचे अर्धशतक
वाचा👉https://t.co/RQLgaEU5GM👈#म #मराठी #Cricket #TeamIndia #INDvNZ— Maha Sports (@Maha_Sports) January 24, 2020
…म्हणून राफेल नदालने किस करत मागितली बॉर्ल गर्लची माफी, पहा व्हिडिओ
वाचा👉https://t.co/cu3sUAz99q👈#म #मराठी #AO2020 #AusOpen #ballgirl #RafaelNadal #Tennis @RafaelNadal— Maha Sports (@Maha_Sports) January 24, 2020