भारतीय क्रिकेट संघाचा अष्टपैलू खेळाडू शार्दुल ठाकूर याची पोस्ट सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. ही पोस्ट व्हायरल होण्यामागील कारण, एकप्रकारे भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा याची पत्नी रितिका सजदेह देखील ठरत आहे. रितिकाने शार्दुल ठाकूरच्या फोटोवर एक कमेंट केली आहे. या कमेंटची सर्वत्र चर्चा होत आहे.
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (World Test Champion) फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध (Australia) सामना होणार्या भारतीय संघाचा (Indian Team) एक भाग म्हणून ठाकूर आगामी सामन्याच्या तयारीमध्ये व्यस्त आहे. या फायनस सामन्यासाठीचे सर्व 15 खेळाडू आणि तीन राखीव खेळाडू लंडनमध्ये सामन्यासाठी पोहोचले आहेत. 31 मे रोजी त्याने आपल्या चाहत्यांसाठी काही फोटो शेअर केले आहेत.
रितिका सजदेह आणि शार्दुल ठाकुरची पोस्ट व्हायरल
ऑस्टेलिया विरुद्धच्या अंतिम सामन्यासाठी भारतीय संघातील अष्टपैलु खेळाडू शार्दुल ठाकुर इंग्लंड मध्ये पोहोचला आहे. यावेळी त्याने चाहत्यांसाठी इंग्लंडमधील आपला खास फोटो शेअर केला आहे. यावेळी कॅप्शनमध्ये लिहीले की, ”तुमच्या आतमधील शक्तीला बाहेर येऊ द्या.” यावर कमेंट करत रितिकाने कमेंट करत लिहीले आहे की, ”फोटोसाठी तु चांगली पोज दिली आहे मात्र तुला आणखी प्रयत्न करावे लागतील! ठीक आहे. धन्यवाद.” यावर शार्दुलने प्रत्युत्तर देत कमेंट केली की, ”आगीशिवाय धूर असतो यामध्ये काही आश्चर्य नाही.”
शार्दुलला मिळाला टीममध्ये प्रवेश
दरम्यान, सध्या भारतीय संघासोबत इंग्लंड दौऱ्यावर असणारा शार्दुल, जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात खेळण्याची पूर्ण शक्यता आहे. अंतिम सामन्यात त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळू शकते. कारण, सामने इंग्लंडमध्ये खेळले जाणार आहेत. इंग्लंडच्या खेळपट्टीवर संघ व्यवस्थापन वेगवान गोलंदाजांना संघात प्रधान्य देईल, अशी शक्यता आहे. याआधीही इंग्लंडमध्ये कसोटी सामना खेळला गेला आहे. त्यावेळी शार्दुलने आपल्या गोलंदाजी आणि फलंदाजीने सर्वांना आश्चर्यचकित करून टाकले होते. याच कारणामुळे भारतीय संघ ठाकुरला प्लेइंग 11 मध्ये सामील करू शकतो करण तो गोलंदाजी सोबतच फलंदाजी करण्यास देखील सक्षम आहे.
https://www.instagram.com/p/Cs6JvYgKAFt/?utm_source=ig_web_copy_link&igshid=MzRlODBiNWFlZA==
जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यासाठी भारतीय संघ –
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, केएस भरत (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, शार्दुल ठाकुर, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव, जयदेव उनादकट, ईशान किशन (यष्टीरक्षक).
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या
विराट-स्मिथकडे डब्ल्यूटीसी फायनलमध्ये मोठी संधी, पाँटिंगसह ‘या’ भारतीय दिग्गजाचा विक्रम निघणार मोडीत!
‘आयपीएल 2023 नेहमी लक्षात राहील…’, पाकिस्तानी दिग्गजाने बदलले आपले सूर