दिल्ली | आज (3 नोव्हेंबर) दिल्लीत (Delhi T20) भारत विरुद्ध बांगलादेश (India vs Bangladesh) संघात पहिल्या टी20 सामन्याला सुरुवात झाली आहे. या सामन्यात रोहित शर्माने (Rohit Sharma) विराट कोहलीचा टी20तील एक विश्वविक्रम मोडला आहे.
रोहितला या सामन्यात शफिउल इस्लामने 9 धावांवर बाद केले. पण रोहित जरी या सामन्यात लवकर बाद झाला असला तरी तो आता आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा(Most runs in T20i) करणारा खेळाडू बनला आहे.
रोहितच्या आता आंतरराष्ट्रीय टी20मध्ये 99 सामन्यांत 31.84च्या सरासरीने 2452 धावा झाल्या आहेत. त्याने विराटच्या 2450 धावांच्या विक्रमाला मागे टाकले आहे.
या यादीत 80 टी20 सामन्यातील 2326 धावांसह न्यूझीलंडचा मार्टिन गप्टील तिसऱ्या स्थानी आहे.
भारत आणि बांगलादेशमध्ये होत असलेल्या तीन सामन्यांची टी20 मालिकेचे नेतृत्त्व रोहितकडे सोपविण्यात आले आहे. भारताचा नियमित कर्णधार विराट कोहलीला (Virat Kohli) क्रिकेटच्या व्यस्त वेळापत्रकामुळे विश्रांती देण्यात आली आहे.
आंतरराष्ट्रीय टी20मध्ये सर्वाधिक धावा करणारे फलंदाज
2452- रोहित शर्मा, सामने- 99
2450- विराट कोहली, सामने- 72
2326- मार्टिन गप्टील, सामने- 80