भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा याने पाकिस्तानविरुद्धच्या विश्वचषक सामन्यात जबरदस्त फलंदाजी केली, त्याने खेळलेल्या आक्रमक फलंदाजीबद्दल वेगवेगळ्या स्तरातून प्रतिक्रिया येत आहेत. अशीच एक प्रतिक्रिया पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर याने दिली आहे. यावेळी त्याने रोहित शर्माचे खूप कौतुक केले आहे.
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात भारतीय संघ 192 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरला तेव्हा रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांनी अतिशय वेगवान सुरुवात केली. शुभमन गिल 16 धावा करून बाद झाला पण, कर्णधार रोहित शर्मा एका बाजूला टिकून राहिला आणि त्याने वेगवान फलंदाजी केली. त्याने 63 चेंडूत 6 चौकार आणि 6 षटकारांच्या मदतीने 86 धावांची खेळी केली.
शोएब अख्तरच्या मते रोहित शर्मा पाकिस्तानी गोलंदाजांच्या मागे हात धुवून लागला होता. आपल्या यूट्युब चॅनेलवर बोलताना तो म्हणाला, “हे खूप निराशजनक प्रर्दशन होते. आज भारताने पाकिस्तानला खूप वाईट पद्धतीने धुतलं आहे. मला माहित नाही की रोहित शर्मा एवढे वर्षे कुठे होता. तो खूप मोठा खेळाडू आहे आणि त्याच्याकडे वेगवेळे शाॅट्स आहेत. तो एक परीपूर्ण खेळाडू आहे. त्याने ज्या प्रकारची खेळी खेळली, त्याने पाकिस्तानी गोलंदाजी पूर्णपणे उद्ध्वस्त केली. गेल्या दोन वर्षांपासून धावा काढता येत नसल्याचा बदला त्याने घेतला. रोहित शर्माला अशी फलंदाजी करताना पाहून आनंद झाला. त्याने योग्यप्रकारे पाकिस्तानी गोलंदाजांची धुलाई केली.”
अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या विश्वचषक 2023 च्या सामन्यात भारतीय क्रिकेट संघाने पाकिस्तानचा ७ विकेट्सनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानचा संघ 42.5 षटकांत केवळ 191 धावांवरच गारद झाला. प्रत्युत्तरात भारतीय संघाने हे लक्ष्य 30.3 षटकांत केवळ 3 गडी गमावून पूर्ण केले. विश्चचषकाच्या इतिहासात भारताचा पाकिस्तानविरुद्ध हा आठवा विजय आहे. (Rohit washed us well Pakistan former fast bowler statement about Hitman innings)
महत्वाच्या बातम्या –
हम खडे, तो सबसे बडे! रोहितच्या 6 षटकारांनी रचला मोठा Record, सचिनसह स्वत:चे 3 विक्रम काढले मोडीत
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात ‘या’ पठ्ठ्या ठरला फिल्डर ऑफ द मॅच, शार्दुलच्या हस्ते सन्मान