भारत आणि न्यूझीलंड संघात टी-२० आणि कसोटी मालिका खेळवली जाणार आहे. भारतीय संघात अनेक नवीन खेळाडूंची निवड करण्यात आली आहे तर संघात काही खेळाडूंना नवीन जबाबदाऱ्या देखील देण्यात आल्या आहेत. या टी-२० मालिकेत रोहित शर्मा कर्णधार असेल तर केएल राहुल उपकर्णधार असेल. न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत रोहित शर्मा आणि राहुल द्रविड यांच्यासोबत खेळण्यासाठी केएल राहुल उत्साहित आहे.
ही मालिका सुरू होण्याआधी त्याने रोहित शर्मा आणि नवीन प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्यावर भाष्य केले आहे. त्याने म्हटले आहे की, मुख्य प्रशिक्षक द्रविड चांगल्या ‘सांघिक वातावरणा’वर लक्ष केंद्रित करण्यासाठी ओळखले जातात तर रोहित एक कुशल रणनीतिकार आहे.
पत्रकारांशी बोलताना केएल राहुलने नवीन प्रशिक्षक राहुल द्रविडवरही भाष्य केले. तो म्हणाला, ‘मी खूप भाग्यवान आहे की मला राहुल द्रविड यांचा बराच सहवास लाभला, मी त्यांना खूप आधीपासून ओळखतो. अगदी माझ्या कारकिर्दीच्या सुरुवातीपासूनच, मी त्यांच्या सल्ल्याचे पालन करून खेळ अधिक चांगल्या प्रकारे समजून घेतला आणि माझ्या फलंदाजीत बदल घडवून आणले. कर्नाटकात त्यांनी आम्हा सर्वांना खूप मदत केली आहे.’
केएल राहुल पुढे म्हणाला, ‘प्रशिक्षक या नात्याने ते सर्व युवा खेळाडूंसोबत आहेत. मुख्य प्रशिक्षक म्हणून त्यांनी येणे ही त्याच्याकडून खूप काही शिकण्याची संधी आहे. त्यांचे नाव खूप मोठे आहे आणि त्यांनी देशासाठी काय केले हे आपल्या सर्वांना माहीत आहे.’
टी-२० मालिकेशिवाय केएल राहुल रोहित शर्माच्या कर्णधारपदासाठी देखील उत्सुक आहे. नवीन टी-२० कर्णधार रोहित शर्माबद्दल केएल राहुल म्हणाला, ‘आम्ही त्याला आयपीएलमध्ये पाहिले आहे आणि त्याचे आकडे सर्वकाही सांगतात. त्याला खेळाची उत्तम समज आहे आणि तो एक कुशल रणनीतीकार आहे. त्यामुळेच तो कर्णधार म्हणून इतकं यश मिळवू शकला.
केएल राहुल पुढे म्हणाला, ‘तो ड्रेसिंग रूममध्ये स्थिरता आणेल. पुढील काही आठवड्यांत संघासाठी त्याचे काय लक्ष्य आहेत हे जाणून घेणे रोमांचक असेल. सांघिक खेळांमधील निर्णय एकत्रितपणे घेतले जातात आणि कर्णधाराचे काम आहे की सर्वांचे कार्य हे सुनिश्चित करणे, प्रत्येकाला त्यांच्या भूमिकेची जाणीव करून देणे तेव्हा खेळाडूंना संघात सुरक्षित वाटते.’
महत्त्वाच्या बातम्या-
असे ३ भारतीय क्रिकेटपटू, ज्यांनी एकही शतक न ठोकता वनडे क्रिकेटमध्ये केल्या आहेत सर्वाधिक धावा
बाप से बेटा सवाई! असे ३ मातब्बर क्रिकेटर, जे बनले त्यांच्या वडिलांपेक्षाही जास्त यशस्वी