विश्वचषक 2023 फायनलमधील पराभवानंतर भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा पहिल्यांदाच मीडियासमोर दिसला. या पत्रकार परिषदेत रोहित शर्माने आपले विचार मांडले. वास्तविक, मंगळवारपासून (26 डिसेंबर) भारत विरूद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात 2 कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला कसोटी सामना खेळला जाणार आहे. दोन्ही संघ सेंच्युरियनमध्ये आमनेसामने येणार आहेत. मात्र, याआधी भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत भारतीय संघाच्या कर्णधाराने कसोटी मालिकेत काय रणनीती असणार आहे हे सांगितले.
रोहित शर्मा (Rohit Sharma) म्हणाला, “विश्वचषकाच्या अंतिम सामन्यातील पराभवाची भरपाई दक्षिण आफ्रिकेविरुद्धची कसोटी मालिका जिंकून केली जाऊ शकते की नाही हे मला माहीत नाही. कारण विश्वचषक हे जग आहे. आपण खरोखर दोघांची तुलना करू शकत नाही. मात्र, भारत-दक्षिण आफ्रिका कसोटी मालिकेचा स्वतःचा इतिहास आहे. उदाहरणार्थ, जर आपण जिंकण्यात यशस्वी झालो तर आपल्याला खरोखर आनंद होईल. एवढी मेहनत केली तर काहीतरी मोठे हवे. आम्हा सर्वांना दक्षिण आफ्रिकेविरुद्धची कसोटी मालिका जिंकायची आहे. आम्हाला आशा आहे की, आम्ही कसोटी मालिका जिंकण्यात नक्कीच यशस्वी होऊ.”
रोहित शर्माने विश्वचषक 2023 फायनलवर बोलताना सांगितले की, “असा पराभव सोपा नसतो, पण तुमच्या कारकिर्दीत सर्व गोष्टी घडत राहतात. अशा पराभवानंतर तुम्हाला सावरायला वेळ लागतो. प्रामाणिकपणे सांगायचे झाले तर विश्वचषकाच्या अंतिम फेरीतील पराभवानंतर लोकांचा मोठा पाठिंबा मिळाला. तो पराभव विसरून पुन्हा कामाला लागण्यासाठी चाहत्यांनी मला प्रेरित केले. जवळपास 36 दिवसांपूर्वीभारतीय संघाला विश्वचषकाच्या फायनलमध्ये पराभवाचा सामना करावा लागला होता.” (Rohit’s Big Statement Before South Africa Test Series I’ve worked so hard I need something)
हेही वाचा
विश्वचषकानंतर रोहितची पहिली पत्रकार परिषद; टी20 विश्वचषक खेळण्याचे दिले संकेत, म्हणाला, ‘जे काही माझ्यासमोर…’
KL Rahulचा विकेटकीपिंग डेब्यू, पण पार्थिव पटेलने लुटली मैफील, चाहत्याने ट्रोल करताच म्हणाला, ‘ड्रॉप होतो…’