टेनिस ग्रँड स्लॅम स्पर्धा फ्रेंच ओपन 2023वर टेनिसप्रेमींचे लक्ष लागले आहे. या हंगामात पुन्हा एकदा सर्बियाचा दिग्गज टेनिसपटू नोवाक जोकोविच याने दमदार अंदाजात विजय मिळवला आहे. जागतिक मानांकित 3 क्रमांकाचा खेळाडू जोकोविचने पुरुष एकेरीच्या उपांत्य सामन्यात शानदार विजय मिळवत अंतिम सामन्याचे तिकीट मिळवले आहे. विशेष म्हणजे, जोकोविचचा हा कोणत्याही ग्रँड स्लॅमचा 34वा अंतिम सामना असणार आहे.
नोवाक जोकोविच (Novak Djokovic) याने उपांत्य सामन्यात स्पेनचा जागतिक मानांकित 1 क्रमांकाचा खेळाडू कार्लोस अल्कारेज (Carlos Alcaraz) याचा पराभूत केले. हा सामना जोकोविचने 6-3, 5-7, 6-1, 6-1 असा जिंकला. दोघांमध्ये हा सामना एकूण 3 तास आणि 23 सेकंद चालला.
कार्लोसच्या पायात क्रँप, सामनाही गमावला
कार्लोसने सामन्याचा पहिला सेट 3-6ने गमावला होता. मात्र, दुसऱ्या सेटमध्ये त्याने शानदार टक्कर देत पुनरागमन केले आणि जोकोविचला 7-5ने पराभूत केले. मात्र, यानंतर तिसऱ्या सेटमध्ये कार्लोसच्या डाव्या पायाला क्रँप आला होता. त्यामुळे तो लय गमावून बसला आणि पुनरागमन करू शकला नाही. कार्लोसने क्रँपमुळे तिसरा आणि चौथा सेट 6-1, 6-1 असा गमावला. अशाप्रकारे जोकोविचने सामना नावावर केला.
जागतिक विक्रम रचण्यापासून जोकोविच एक पाऊल दूर
टेनिसच्या दुनियेतील स्पॅनिश स्टार राफेल नदाल (Rafael Nadal) आणि जोकोविच यांनी सर्वाधिक प्रत्येकी 22 वेळा ग्रँड स्लॅम (Grand Slam) किताब जिंकला आहे. त्यामुळे जर जोकोविचने हा फ्रेंच ओपन (French Open) किताब जिंकला, तर तो सर्वाधिक 23 ग्रँड स्लॅम जिंकून इतिहास रचेल आणि नदालला पछाडेल. यासोबतच जोकोविचला आता फक्त एक अंतिम सामना जिंकायचा आहे. यासोबतच तो जागतिक मानांकित 1 क्रमांकाचा टेनिसपटू बनेल.
जोकोविचने जिंकला 91वा फ्रेंच ओपन सामना
या सामन्यासह जोकोविचने अनेक विक्रम आधीच आपल्या नावावर केले आहेत. पहिला विक्रम म्हणजे, त्याने फ्रेंच ओपन स्पर्धेचा 91वा सामना जिंकला. तो अशी कामगिरी करणारा पाचवा खेळाडू बनला आहे. तसेच, जोकोविच टेनिसच्या ग्रँड स्लॅम स्पर्धेचा एकूण 34व्यांदा अंतिम सामना खेळणार आहे. अंतिम सामन्यात जोकोविचचा सामना जागतिक मानांकित 2 क्रमांकाचा नॉर्वेचा खेळाडू कॅस्पर रूड याच्याशी होणार आहे. या सामन्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (roland garros tennis player novak djokovic in french open 2023 final grand slam)
महत्वाच्या बातम्या-
जोकोविच नदालवर भारी! रोलँड-गॅरोस स्पर्धेतील ‘हा’ भलामोठा विक्रम केला नावावर
मोठी बातमी! फ्रेंच ओपनमध्ये वर्ल्ड नंबर 1 स्वियाटेक अन् गॉफचा दणदणीत विजय